शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम

By मनीषा म्हात्रे | Updated: November 8, 2024 22:16 IST

Raj Thackeray Speech: महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. - राज ठाकरे.

भांडुप पूर्वेकडील दातार कॉलनी येथे मनसे नेते राज ठाकरे यांची सभा झाली. विक्रोळीचे उमेदवार विश्वजित ढोलम यांना निवडून देण्याचे आवाहन राज यांनी केले. यावेळी पुढच्या ७-८ दिवसात आणखी एक सभा विक्रोळीला घेणार असल्याचे ते म्हणाले. कोण दादागिरी करत असेल तर त्याला दुप्पट दादागिरी करणार असल्याचा इशारा राज यांनी दिला. 

महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. महाराष्ट्राचा विचका करून टाकला आहे, याचा बदला २० तारखेला घ्यायचा आहे, अशी टीका राज यांनी संजय राऊत यांच्यावर केली. 

यावेळी राज यांनी बाळासाहेबांची आठवण सांगितली. मी लहान होतो, आमचे गाडीचे चालक माने म्हणून होते. तुळशी रोड म्हणून एक रोड आहे. तिथे एक ब्लू पर्ल येथे शिवसेनेचे कार्यालय होते. मला बाळासाहेबांनी घेतले आणि आम्ही निघालो तिकडे. तेव्हा माने आले नव्हते. आम्ही टॅक्सी केली, आम्ही चाललो ट्रॅफिक नव्हते. ७३-७४ सालची गोष्ट असेल. महापौरांची  इम्पाला गाडी होती, सुधीरभाऊ आले. बाळासाहेबांचे काम होते, ते बोलले मी सोडतो तुम्हाला, तेव्हा बाळासाहेब बोलले मी लाल दिव्याच्या गाडीत बसणार नाही असे म्हणत आम्ही ट्रक्सीनेच पुढे निघालो. बांद्रा येथे मागे पाहिले तर लाल दिव्याची गाडी मागून येत होती, असे राज म्हणाले. 

यावरून राज यांनी ज्याने लहानपणी असे पाहिले तो बसेल का लाल दिव्याच्या गाडीत? असा सवाल केला. मात्र एकाने ज्यांच्या विरोधात लढला त्यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदासाठी जाऊन बसला. मुख्यमंत्री झाल्यानंतर धांगेखालून ४० आमदार गेले. शिंदे आले, ते म्हणाले अजित पवार असतील तिथे मी बसणार नाही. अचानक भाजपने दुसरीकडे डोळा मारला. मांडीला मांडी लावून बसणार नव्हते ते आता मांडीवर येऊन बसलेत, अशी टीका राज यांनी केली. तुम्ही लाचार सारखे यांना मतदान करताय, तुम्हाला गृहीत धरले जाते. क दिवस जगलात मतदानाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मेला तरी चालेल, असे राज यांनी मतदारांना म्हटले. 

ग्रामीण भागातील मुले मुंबई पुण्यात येतात, आणि तिथली मुले विदेशात जातायत. सगळीकडे बोजवारा सुरू आहे, आणि यांचे राजकीय खेळ सुरू आहेत. बाळासाहेब म्हणाले होते माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस झाली तर शिवसेना नावाचे दुकान बंद करेन अन त्यांचे चिरंजीव काँग्रेसच्या पंज्याचा प्रचार करत आहेत, असा टोला राज यांनी लगावला.

मी शिवसेना सोडत होतो तेव्हा ३५ आमदार आलेले...मला काही गोष्टी पटल्या नाहीत. मी बाहेर पडलो ३५ आमदार आले होते माझ्याकडे, १५ खासदार आले होते, मला म्हणाले जाऊ काँग्रेस सोबत, पण मी नाही म्हणालो. शिवसेना फोडून मला काही करायचे नव्हते. बाकीचे बाळासाहेबांच्या नावाने मत मागतात. मी माझ्या जीवावर आलो आहे. एकदा या राज ठाकरेला संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा येणार नाही, त्यांच्या सारखं निर्लज्ज नाही मी. असे राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेvikhroli-acविक्रोळीMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४