शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; कार्यभार फणसळकर यांच्याकडे, केंद्रीय निवडणूक आयाेगाने काढले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 07:39 IST

Maharashtra Assembly Election 2024:

 मुंबई - राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. रिक्त महासंचालक पदासाठी फणसळकर यांच्यापाठोपाठ संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि रितेश कुमार यांच्या नावाचीही चर्चा आहे.

पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. सेठ यांच्यानंतर राज्य सरकारने पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविला होता. मात्र, ४ जानेवारी रोजी महासंचालक म्हणून फोन टॅपिंगच्या आरोपांतून मुक्त झालेल्या शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी झाले.

बदली फक्त निवडणुकीपुरती?- शुक्ला यांची फक्त निवडणूक काळापर्यंत बदली करण्यात आली असून, निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात येणार असल्याचे समजते आहे.- नवीन डीजी हे फक्त निवडणूक काळापुरतेच मर्यादित असतील, अशीही चर्चा मुख्यालयात सुरू आहे.

बिपिन कुमार सिंग यांच्या नावाची चर्चा अन् ब्रेक१९९० च्या बँचचे महासंचालक बिपिन कुमार सिंग यांच्या नावाचीही सकाळपासून चर्चा होती. त्यांच्या कार्यालयीन माहितीत १९६५ चा जन्माची नोंद असल्यामुळे त्यानुसार, पुढच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये निवृत्त होणार होते. मूळ जन्मतारीख १९६४ ची असल्याने ते तीन दिवसांपूर्वीच निवृत्त झाल्याचे समजले. ज्येष्ठतेनुसार त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ते तीन दिवसांपूर्वी निवृत्त झाले असून तारखा मधील गोंधळामुळे नावाचा उल्लेख झाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

विरोधकांचे आरोप निवडणुकीच्या काळात शुक्ला यांना पदावरून हटवावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. विरोधकांनी केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत शुक्ला यांच्या कार्यकाळात निष्पक्ष निवडणूक पार पडणार नाही, असा आरोप केला. त्यानंतर आयोगाने सोमवारी शुक्ला यांची बदली केली.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rashmi Shuklaरश्मी शुक्लाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग