शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 12:36 IST

सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली असून त्याचा फायदा कुणाला होणार हे निकालात स्पष्ट होईल. तत्पूर्वी बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा कल दाखवण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडी १७०-१७५ जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. त्याचसोबत काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असं विधान केल्यानं मुख्यमंत्रि‍पद काँग्रेसकडे असेल असे सूतोवाच केले आहे. मात्र पटोलेंच्या या विधानावर संजय राऊतांनी टोला लगावला. 

संजय राऊत म्हणाले की, पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे मी मानत नाही. महाविकास आघाडीचं सरकार असेल आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जर नाना पटोले असं म्हणत असतील, पटोलेंना जर हायकमांडने सांगितले असेल तुम्ही मुख्यमंत्री बनणार आहात तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर करायला हवं असा टोला त्यांनी लगावला. 

पटोले-राऊतांचा वार-पलटवार

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात पहिल्यांदाच असा वाद नाही. हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर खासदार संजय राऊतांनी काँग्रेसवर तिखट प्रतिक्रिया दिली होती ज्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला. महाविकास आघाडीतील जागावाटप, मुख्यमंत्रिपद यासारख्या विविध मुद्द्यांवरून अनेकदा राऊत-पटोले आमनेसामने आले आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतरही मुख्यमंत्रि‍पदावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. रात्री ११.३० च्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.०२ टक्के मतदान झाले आहे. अद्याप अंतिम आकडेवारी आली नाही. त्यामुळे यात वाढ होण्याचीही शक्यता आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपा १४९, शिवसेना ८१ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ५९ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस १०१, ठाकरे गट ९५ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८६ जागांवर उमेदवार उतरवले होते. महायुती असो वा मविआ यांच्यात काही मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उतरवले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं दिसून आले. त्याशिवाय मनसे, वंचित आणि अपक्षांमुळे निकालात किती फरक पडतो हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतMahayutiमहायुतीBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस