शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंतांना डावलून विधान परिषदेवर बाहेरचेच

By admin | Updated: June 9, 2014 02:33 IST

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य पाठविताना निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांनाच आमदारकी दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी दिसून येते.

मुंबई : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य पाठविताना निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांनाच आमदारकी दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी दिसून येते. काँग्रेसच्या ४ आणि राष्ट्रवादीच्या ६ अशा एकूण १० जणांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकी मिळालेले राहुल नार्वेकर आधी शिवसेनेत होते. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मावळ मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली, मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे. रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत. नागपूरचे प्रकाश गजभिये हे रामदास आठवले यांच्या रिपाइंमध्ये होते. २००९ची विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढविली होती. सध्या ते राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांना आमदारकीची बक्षिसी देऊन इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, यासाठी संघर्ष करणारे विजय कांबळे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांना पुन्हा आमदारकी मिळाली. पूर्वी त्या जनता दलाच्या कार्यकर्त्या होत्या. काँग्रेसमध्येही निष्ठावंतांना डावलल्याची भावना आहे. काँग्रेसकडून वर्णी लागलेले सोलापुरातील रामहरी रुपनवर पूर्वी भाजपामध्ये होते. (विशेष प्रतिनिधी)