शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील धरणात अत्यल्प जलसाठा

By admin | Updated: February 11, 2015 23:59 IST

दुष्काळाचे सावट; पश्‍चिम व-हाडातील ९३ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात !

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : अत्यल्प जलसाठय़ामुळे पश्‍चिम वर्‍हाडातील सरासरी ९३ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा धोक्यात आल्या आहेत. मान्सुनने दगा दिल्यामुळे खरीप हंगामात शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणावर झळ सोसावी लागली. त्यानंतर रब्बी हंगामालाही अत्यल्प पावसाचा फटका बसला आहे. अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी सरासरी ९३ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावर फळबाग फुलविली आहे. परंतु, विभागातील बहुतांश धरणांमध्ये सरासरी ४0 टक्क्याच्या आतच जलसाठा उरला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकाळी तालुक्यातील काटेपुर्णा धरणात २८ टक्के जलसाठा असून, दगडपारवा धरणातील जलपातळी शुन्यावर पोहचली आहे. पातुर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ४0 टक्के, मुर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम धरणात १७ टक्केच जलसाठा आहे. निगरुणा व तेल्हारा तालुक्यातील वाण धरणातील पाणी पातळीही खालावत चालली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणात ४५ टक्के, खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात ६0 टक्के व इतर धरणांमधील पाणी पातळीही खालावली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४५ टक्केच जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील पूस प्रकल्प, महागाव तालुक्यातील लोअस पूस या मध्यम धरणातही जलसाठा खालावत चालला आहे. तर केळापूर परिसरातील सायखेडा मध्यम प्रकल्पाची पातळी ४७ टक्के व नेर तालुक्यातील गोकी मध्यम प्रकल्पाची पातळी ५0 टक्क्यावर पोहचली आहे. घाटंजी तालुक्यातील वाघाडी मध्यम प्रकल्प, बोरगाव मध्यम धरणांसह अमरावती जिल्ह्यातील जलसाठाही खालावत चालला आहे. अमरावती विभागातील बहुतांश धरणातील जलसाठे ४0 टक्केच्या खाली आल्याने फळबांगावर पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. *फळबागा धोक्यातशेतकर्‍यांचा आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा कल वाढला असल्याने फळबाग लागवडीच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात २0 हजार १८१ हेक्टर, अकोला जिल्ह्यात १७ हजार ६0४ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३ हजार ५८४ हेक्टर, अमरावती जिल्ह्यात ३२ हजार ३५ हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात १९ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे.