शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागांतील फेऱ्यांमुळे तोटा

By admin | Updated: October 9, 2015 01:31 IST

‘गाव तेथे एसटी’ अशी संकल्पना रावबत एसटी महामंडळाकडून दुर्गम भागातही बससेवा दिली जाते. या सेवेमुळे मात्र महामंडळाला मोठा फटका बसत असून वर्षाला तब्बल ५७३

मुंबई : ‘गाव तेथे एसटी’ अशी संकल्पना रावबत एसटी महामंडळाकडून दुर्गम भागातही बससेवा दिली जाते. या सेवेमुळे मात्र महामंडळाला मोठा फटका बसत असून वर्षाला तब्बल ५७३ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. मागणीनुसार या फेऱ्या चालवत असल्यामुळे एसटीकडून त्या बंद करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात एसटीच्या दररोज ९२ हजार फेऱ्या धावतात. यातील २९ हजार ४00 फेऱ्या या कमी उत्पन्नाच्या असून, त्यामुळे महामंडळाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी नसतानाही दुर्गम भागात ही सेवा देताना दरवर्षी तोटा एसटीला होतो.प्रवासी कमी असल्याने दुर्गम भागात चालणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही तोट्यात जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. एसटीचे तोट्यातील मार्गांची माहीती एसटी महामंडळाकडून सार्वजनिक उपक्रम समितीला दोन ते तीन महिन्यांत सादर केली जाणार आहे. हे मार्ग खासगी वाहतूकदारांना देण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. लांब पल्ल्यांचे तोट्यातील मार्ग कोणते याची माहिती एसटीकडून मिळविण्यात येत आहे. खासगी वाहतूकदारांकडून हेच मार्ग वापरले जातील. दुर्गम भागातील आणि कमी अंतराचे मार्ग त्यांना फायदेशीर ठरणारे नाहीत, असे सांगण्यात आले. प्रवाशांची संख्या घटलीराज्यात एसटीच्या १७ हजार बस असून, वर्षाला ६७ ते ६८ लाख प्रवासी यामधून प्रवास करतात. गेल्या वर्षभरात एसटीचे ११ कोटी प्रवासी कमी झाले आहेत. २0१३-१४ मध्ये २५६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. हाच प्रवास २0१४-१५ मध्ये फक्त २४५ कोटी प्रवाशांनी केला आहे.