शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थानच्या नियुक्त्या लांबणीवर

By admin | Updated: March 21, 2015 01:32 IST

शिर्डीच्या विकासाप्रमाणेच साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासह अन्य महामंडळांच्या नियुक्त्या सेना-भाजपातील गृहकलहामुळे पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़

प्रमोद आहेर - शिर्डीशिर्डीच्या विकासाप्रमाणेच साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासह अन्य महामंडळांच्या नियुक्त्या सेना-भाजपातील गृहकलहामुळे पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़ अशाच अंतर्गत धुसफुसीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारही या नियुक्त्या अखेरपर्यंत करू शकले नव्हते़भाजपाने सरकार स्थापन केल्यानंतर राजकीय तडजोडीसाठी महामंडळाच्या नियुक्त्या मागे ठेवल्या़ त्यात साईसंस्थानही अडकले आहे. साई संस्थान तसेच चांगली महामंडळे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी दोन्हीही पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू होती़ मात्र सेना-भाजपातील कलहाने पेट घेतल्याने भाजपाकडून सावध पावले टाकण्यात येत आहेत़ राजकीय घडामोडीत सत्तेतील साथीदार बदलले तर महामंडळ सदस्यांच्या नियुक्त्या कार्यकाल संपेपर्यंत किंवा तत्काळ मागे घेणे अवघड असल्याची भाजपाला जाणीव आहे़ त्यामुळे सेनेशी असलेले मतभेद संपुष्टात येत नाहीत, तोवर भाजपाकडून संस्थानसह महामंडळाच्या नियुक्त्या होण्याची शक्यता धूसर झाली आहे़ त्यातच अलीकडे भाजपा व राष्ट्रवादीचे मधुर संबंध पुन्हा प्रस्थापित होवू पहात आहेत़ त्याचाही परिणाम या नियुक्त्यांवर होऊ शकतो. या सर्व शक्यता विचारात घेता राजकीय धूळवड संपल्याशिवाय साईबाबा संस्थान व महामंडळाची गुढी उभारण्याची शक्यता मावळली आहे़आगामी कुंभमेळ व साई समाधी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर विकासकामे तातडीने मार्गी लागण्यासाठी विश्वस्त मंडळ आवश्यक आहे़ पायाभूत सुविधांच्या कमतरतेने व गर्दी व्यवस्थापनातील त्रुटीमुळे काही दुर्घटना घडली तर ही राजकीय धुळवड महागात पडू शकेल, अशी चर्चा आहे.