शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

सस्पेन्स कायमच ! महायुतीत नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गचा निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 5:27 AM

Lok Sabha Election 2024 : नाशिकवरून शिंदे गट अन् अजित पवार गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

मुंबई : महाविकास आघाडीत चर्चा सुरू असतानाही उद्धव ठाकरे यांनी सांगली, उत्तर-पश्चिम मुंबईच्या जागेवरील उमेदवार जाहीर करून टाकले होते. मात्र, महायुतीत वादात अडकलेल्या नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, औरंगाबाद, उत्तर- पश्चिम मुंबई या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यांनी गुरुवारी जाहीर झालेल्या आठ जागांपैकी सात ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी दिली.

वादग्रस्त जागांना हात न लावण्याचे धोरण शिंदे यांनी अंगीकारल्याचे त्यांच्या पहिल्या यादीवरून दिसते. नाशिकवरून शिंदे गट अन् अजित पवार गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिकचे खा. हेमंत गोडसे उमेदवारीसाठी सातत्याने शिंदेंना भेटत आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी शिंदेंकडे जोर लावला आहे.

औरंगाबादच्या जागेचा आग्रह कायमऔरंगाबादची जागा आपल्याकडे घ्या, असा तेथील नेत्यांचा शिंदेंवर दबाव कायम आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.ठाणे आणि पालघर भाजपला २ हवे आहे, शिंदे या जागा सोडायला तयार नाहीत, असे चित्र आहे. पालघरमध्ये राजेंद्र गावित हे शिंदे गटाचे खासदार आहेत. शिंदे 'ठाणेदार असल्याने अडले आहेत. औरंगाबाद, सिंधुदुर्ग-रत्नागिरी व ठाणे वगळता वादातील अन्य खासदार शिंदे गटाचे आहेत.

उमेदवारी जाधवांना, अर्ज गायकवाडांचाबुलढाण्याचे शिदे गटाचेच आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला असला तरी एबी फॉर्म जोडलेला नाही. या मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. गायकवाड यांचा हा स्टंट असल्याचे म्हटले जाते. सायंकाळी त्यांनी जाधव यांच्याशी बंदद्वार चर्चा केली.

श्रीकांत शिंदे वेटिंगवर मुख्यमंत्री शिदे यांचे पुत्र श्रीकांत शिदे यांचे नाव पहिल्या यादीत नाही. कल्याणसह कोकणातील भाजप-शिवसेनेचे जागावाटप अंतिम व्हायचे असल्याने ते वेटिंगवर आहेत. यवतमाळ-वाशिममध्ये भावना गवळी की संजय राठोड की आणखी कोण हा सस्पेन्सही कायम ठेवला आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती