शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई खोळंबली, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा ठप्प

By admin | Updated: June 19, 2015 13:29 IST

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य व हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प पडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ - मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे अशा तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. 

मुंबई व परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साठले आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला, शीव येथे रुळांवर पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प पडली. तर हार्बर व पश्चिम रेल्वे येथील वाहतूकही पाणी साचल्याने ठप्प पडली. लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांना याचा फटका बसला असून काही एक्सप्रेस गाड्यांचे एसीही बंद पडल्याने प्रवाशांच्या हालात भर पडली आहे. कर्जत, कसारा व कल्याण ते ठाण्यापर्यंतची धीम्या मार्गावरील  वाहतूक संथगतीने सुरु आहे. ठाणे ते सीएसटी पर्यंतची वाहतूक ठप्प पडली आहे. तर हार्बर मार्गावर वाशी - मुंबई सीएसटी, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट - माहीम दरम्यानची वाहतूक बंद पडली आहे.  मुंबई मंहापालिकेने शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून अत्यावश्यक कामं असतिल तरच घराबाहेर पडावे असा सल्ला सरकारी अधिका-यांनी दिला आहे. पावसाने जनजीवन विस्कळित झाल्यामुळे शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच न्यायालयाचे कामकाजही बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला. राजकीय कार्यक्रमही आज रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव व कौल्हापूरला जाणार होते. मात्र, आपत्कालिन स्थिती बघता त्यांनी दौरा रद्द केला आणि मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये फडणवीसांनी हजेरी लावली आणि परिस्थितीची माहिती घेतली. दुपारी २.३० वाजता संपू्र्ण भरतीची वेळ असल्याने त्याआधी मुंबईतील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

आपत्तीमध्ये भर पडू नये म्हणून मुंबईतील अनेक सखल भागामधील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून परिस्थिती पूर्वपदावर येताच वीजपुरवठा सुरळित करण्यात येणार आहे.