शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:33 IST

बुलढाणा नगरपालिका निवडणूकीसाठी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे‌. मतदानाला दीड तास झाले नाही तितक्यात याठिकाणी बोगस मतदार आढळल्याची माहिती समोर आली

राज्यातील २६४ नगरपालिका, नगर पंचायतीसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतदानास सुरुवात झाली. ग्रामीण भागात काही ठिकाणी थंडी असल्याने सकाळी संथगतीने मतदान सुरू होते, तर काही भागात लोकांच्या मतदानासाठी लांबच्या लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. 

सोलापूरातील अकलूज नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. मात्र काही मिनिटांनी इथं ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर १ तास मशिन बंद पडल्याने मतदारांच्या रांगा लागल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ९.३० पर्यंत सावंतवाडीत १२.१७ टक्के, मालवण १५.१८ टक्के, वेंगुर्ला १०.५१ टक्के तर कणकवलीत १५.८४ टक्के मतदान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून एकूण २०० मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. शिंदेसेनेचे उदय सामंत, रामदास कदम, मंत्री योगेश कदम तर माजी आमदार रमेश कदम आणि उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पाणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सांगलीच्या आष्टी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन नादुरुस्त असल्याने सकाळी सात ते नऊ पर्यंत मतदान ठप्प होते. मात्र २ तासांच्या प्रतिक्षेनंतर ९ वाजल्यापासून मतदान सुरळीत सुरू झाले. 

भोरमध्ये चक्क हळदी कुंकवाने पूजा

भोर येथे मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आले. याठिकाणी चक्क मतदान केंद्रावर EVM मशिनची हळदी कुंकवाने पूजा केली. त्याशिवाय मशिनची आरतीही केली. भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. अधिकाऱ्यांनी या केंद्रावरील केंद्रप्रमुखावर कारवाई करत नवीन केंद्र प्रमुखाची नियुक्ती केली. त्याशिवाय ईव्हीएमची पूजा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बुलढाण्यात बोगस मतदार पकडले

बुलढाणा नगरपालिका निवडणूकीसाठी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे‌. मतदानाला दीड तास झाले नाही तितक्यात याठिकाणी बोगस मतदार आढळल्याची माहिती समोर आली. प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता.मोताळा येथील एका जणाने उमेदवाराला मतदान केल्यानंतर पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण असल्याचं कळले. इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

शिंदेसेनेच्या आमदाराकडून गोपनीयतेचा भंग

हिंगोली येथील शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी महिला मतदाराला कुठे मतदान करायचे हे सांगितल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मतदान केंद्रावर आमदार संतोष बांगर यांचा वावर दिसून आला. विशेष म्हणजे बांगर यांच्या वर्तवणुकीवर निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही. महिला मतदान करत असताना आमदार बांगर तिथे गेले आणि कुठे मतदान करायचे हे सांगितले. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. चौकशी करून अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करू असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलं.

दरम्यान, तब्बल आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नगरपालिका व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी १७ हजार ३६७ कंट्रोल युनिट; तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिट वापरली जाणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : EVM Glitches, Bogus Voters, Long Queues Mark Municipal Elections

Web Summary : Maharashtra municipal elections faced disruptions: EVM malfunctions in Akuluj, bogus voters in Buldhana, and long queues elsewhere. Voting proceeded despite delays, with key politicians' reputations at stake across 264 locations. Elections are happening after 8-10 years.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकVotingमतदानElectionनिवडणूक 2024EVM Machineईव्हीएम मशीनMaharashtraमहाराष्ट्र