शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:37 IST

Local Body Election 2025: नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी  उमेदवारही दिले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यावरून आता भाजपाने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला डिवचले आहे.

राज्यात सध्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षच एकमेकांविरोधात आमने सामने आलेले दिसत आहेत. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडी कमालीची विस्कळीत झालेली दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी  उमेदवारही दिले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यावरून आता भाजपाने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला डिवचले आहे.

सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला या संदर्भात टोला लगावताना भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, ‘’ना उमेदवार, ना मतदार, कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार ? नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची मुदतही संपली, पण मविआतील घटक पक्षांकडे मैदानात उतरविण्यासाठी उमेदवारच नाहीत’’.

‘’राणा भीमदेवी थाटात लढण्याची घोषणा करणाऱ्या या मविआतील तिन्ही पक्षांना आघाडी करूनसुद्धा अनेक ठिकाणी जिंकण्यायोग्य सोडा, साधा मैदानात उभा करण्याजोगा उमेदवारही मिळत नाहीये. ही इतकी दयनीय अवस्था का होत आहे? आधी लढा तरी… आरोप करण्यासाठी मैदानात उतरावे लागेल, ती लढाईची खरी जागा आहे, असा सल्लाही उपाध्ये  यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP taunts: Where are Thackeray's and MVA's challenging candidates?

Web Summary : BJP mocks Thackeray group and MVA as local elections reveal disarray. Mahavikas Aghadi struggles to field candidates, prompting BJP's Keshav Upadhye to question their absence and fighting spirit. Upadhye advises MVA to fight elections before making allegations.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMaharashtraमहाराष्ट्रMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा