शेतकर्‍याच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

By Admin | Updated: July 11, 2014 01:06 IST2014-07-11T00:30:46+5:302014-07-11T01:06:13+5:30

अकोला जिल्ह्यातील चिंचोली येथील हत्याकांड

The life imprisonment for both the farmers | शेतकर्‍याच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

शेतकर्‍याच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

अकोला: अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील खूनप्रकरणी दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी पूर्ववैमस्यातून गावातील एका शेतकर्‍याचा ६ एप्रिल २00९ रोजी खून केला होता.
चिंचोली रूद्रायणी येथील ज्ञानदेव ठाकरे हे शेतात काम करीत असताना त्यांच्याशी लक्ष्मण हरीशचंद्र भटकर आणि देवीदास उर्फ सहदेव सुखदेव वानखडे यांनी पूर्ववैमस्यातून वाद घातला. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर कुर्‍हाड आणि काठीने हल्ला केला. या हल्ल्यात ठाकरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ज्ञानदेव ठाकरे यांच्या पत्नी सिंधुताई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाश्रीटाकळी पोलिस ठाण्यात भादंविचे कलम ३0२ (खून) व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सिंधुबाई आणि त्यांची मुलगी योगिता हिने आरोपीच्या हातात कुर्‍हाड बघितली होती.
तत्कालीन ठाणेदार वसंत सोनोने यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.सी. बावसकर यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाने १0 साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे, ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपींना तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. सरकारकडून अँड. मंगला पांडे यांनी युक्तिवाद केला. आरोपींची बाजू अँड. मोहन मोयल आणि अँड. संजय अटल यांनी मांडली.

Web Title: The life imprisonment for both the farmers