शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोंडुसकर ट्रॅव्हल्सचा परवाना रद्द

By admin | Updated: March 12, 2015 06:04 IST

कोंडुसकर ट्रॅव्हल्सशी संबंधित गोदामांमध्ये अमली पदार्थांचा साठा आढळून आल्याने या ट्रॅव्हलिंग एजन्सीचा परवाना रद्द करून सखोल चौकशी केली जाईल,

मुंबई : कोंडुसकर ट्रॅव्हल्सशी संबंधित गोदामांमध्ये अमली पदार्थांचा साठा आढळून आल्याने या ट्रॅव्हलिंग एजन्सीचा परवाना रद्द करून सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. त्याचबरोबर मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात सापडलेल्या अमली पदार्थाच्या साठ्याबाबत जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आश्वासनही पाटील यांनी दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी मेफेड्रोन (एम.डी.) या अमली पदार्थाच्या महाराष्ट्रातील प्रमुख महानगरातील वाढत्या सेवन, विक्रीबाबत लक्षवेधी सूचना दिली होती. त्यावरील चर्चेत शेकापच्या जयंत पाटील यांनी कोंडुसकर ट्रॅव्हल्स ही कंपनी अमली पदार्थांच्या व्यवहारात पुन्हा एकवार सापडली असून यावेळी त्यांच्या गोदामात अमली पदार्थाचा साठा आढळल्याने त्यांचा वाहतूक परवाना रद्द करून चौकशी करण्याची मागणी केली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी ती तत्काळ मान्य केली. तत्पूर्वी धनंजय मुंडे यांनी मरिन लाइन्स पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धर्मराज काळोखे यांच्याकडे अमली पदार्थाचा साठा आढळल्याचा मुद्दा उपस्थित केला. वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याखेरीज काळोखे यांनी हे कृत्य केले नसेल. त्यामुळे वरिष्ठांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली. एमडी या अमली पदार्थाचा नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रापिक सब्स्टंन्सेस अ‍ॅक्टमध्ये १५ फेब्रुवारी २०१५ रोजी समावेश केला असल्याचे राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)