शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद पाच वेळा तहकूब

By admin | Updated: April 2, 2015 03:02 IST

गेल्या चार दिवसांत नागपूर, अहमदनगर व अन्य भागांत झालेल्या गुन्हेगारीच्या गंभीर घटनांबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव

मुंबई : गेल्या चार दिवसांत नागपूर, अहमदनगर व अन्य भागांत झालेल्या गुन्हेगारीच्या गंभीर घटनांबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याच्या मागणीवरून बुधवारी विधान परिषदेचे कामकाज तब्बल पाचवेळा तहकूब झाले. अखेरीस चर्चेला प्रारंभ झाला तेव्हा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच माणिकराव ठाकरे यांनी राज्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे गृह खात्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते मुंडे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दुरवस्थेबाबत विरोधी पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची व सर्व कामकाज बाजूला सारून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. माणिकराव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला. ही मागणी स्वीकारण्यास संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी विरोध केला. त्यामुळे सभागृहात घोषणाबाजी सुरु झाली व सर्वप्रथम २० मिनिटांकरिता कामकाज तहकूब झाले. त्यानंतर चारवेळा दहा मिनिटांकरिता कामकाज तहकूब करण्यात आले.अखेरीस नियम ९७ अन्वये चर्चेचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, नागपूर येथील मध्यवर्ती तुुरुंगातून पाच कैदी पळून गेले ही अत्यंत गंभीर घटना आहे. येथील तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे हे त्यांच्या केबिनमध्ये कैद्यांच्या नातलगांना बोलावून त्यांचे वाढदिवस साजरे करीत होते. नगरमधील कायदा व सुव्यवस्थाही ढासळलेली आहे. एक महिन्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या ३० केसेस दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या अहमदनगर जिल्ह्यात जर ही अवस्था असेल तर राज्यात कायद्याचे राज्य आहे हे आपण कसे म्हणणार, असा सवाल मुंडे यांनी केला. निवडणूक प्रचारात राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र त्याला आपण पात्र नाही अशी कबुली आता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील महिला दक्षता समित्यांची पुनर्रचना करण्याची मागणी केली तर नागपूरमधील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रकाश गजभिये यांनी केली. यावेळी भाई जगताप, विद्या चव्हाण, हरिभाऊ राठोड, हेमंत टकले यांची भाषणे झाली. (विशेष प्रतिनिधी)