शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी दिवे ‘पेटलेले’

By admin | Updated: March 12, 2015 05:12 IST

मरीन ड्राईव्हवर लावलेले एलईडी दिवे तत्काळ काढून क्वीन्स नेकलेसला पुन्हा लकाकी द्यावी, अशी मागणी बेस्ट प्रशासनाकडे शिवसेनेने आज केली़ त्याचवेळी या

मुंबई : मरीन ड्राईव्हवर लावलेले एलईडी दिवे तत्काळ काढून क्वीन्स नेकलेसला पुन्हा लकाकी द्यावी, अशी मागणी बेस्ट प्रशासनाकडे शिवसेनेने आज केली़ त्याचवेळी या दिव्यांमुळे विजेची बचत होत असल्याचा होरा भाजपाने लावला आहे़ उभय पक्षांमधील या भांडणात बेस्ट प्रशासनाची कोंडी झाली आहे़ परंतु दिवे काढण्याचे अधिकार बेस्टला नाही, असे स्पष्ट करत महाव्यवस्थापकांनी यातून आपली सुटका करुन घेतली़मुंबईतील पिवळे दिवे बदलून एलईडी बसविण्याचा उपक्रम भाजप सरकारने घेतला आहे़ पालिकेच्या तिजोरीतूनच यासाठी खर्च होणार आहे़ भाजपने या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय लाटत शिवसेनेच्या तोंडाला पाने पुसली़ परिणामी उभय पक्षांमध्ये वाद पेटला आहे़ त्यामुळे मरीन ड्राईव्हवर बसविण्यात आलेले दिवे काढण्याची सूचना शिवसेनेचे सुहास सामंत यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली़ बेस्ट समितीला विश्वासात न घेता हे दिवे बसवून समितीचा एकप्रकारे अवमानच करण्यात आला आहे़ आर्थिक संकटात असलेल्या बेस्टवर केंद्र सरकार अन्याय करीत असल्याच्या निषेधार्थ समाजवादीचे याकूब मेमन यांनी सभात्याग केला़ मनसे आणि काँग्रेस पक्षानेही एलईडी दिव्यांचा विरोध केला़ (प्रतिनिधी)