शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’ला आता एप्रिलचा मुहूर्त !

By admin | Updated: December 18, 2014 10:17 IST

सत्तेवर येताच एक महिन्याच्या आत राज्यातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करू, अशी वल्गना करणाऱ्या भाजपाने आता मात्र त्यासाठी एप्रिलचा मुहूर्त निश्चित केला आहे.

नागपूर : सत्तेवर येताच एक महिन्याच्या आत राज्यातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करू, अशी वल्गना करणाऱ्या भाजपाने आता मात्र त्यासाठी एप्रिलचा मुहूर्त निश्चित केला आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधान परिषदेत तशी घोषणा केली.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी एलबीटीबाबत शासनाची भूमिका मांडली. एलबीटी आम्ही आजदेखील रद्द करू शकतो; परंतु त्यातून तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. एलबीटी रद्द करून नव्या आर्थिक वर्षात राज्यात जीएसटी (गूड्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) लागू करण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारने या अधिवेशनात ‘जीएसटी’ विधेयक आणण्याचे निश्चित केले आहे. ‘जीएसटी’मध्ये जकात कराचा समावेश नाही. त्यामुळे त्याचा महसूल राज्याला मिळणार नाही. यासंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व मुख्यमंत्र्यांमध्ये तीन बैठका झाल्या आहेत. ‘एलबीटी’ व जकात रद्द केल्यानंतर राज्याचे होणारे नुकसान केंद्र सरकार भरून काढणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सुमारे १४ हजार कोटी तडजोड रक्कम म्हणून देणार असल्याचे खडसेंनी सभागृहाला सांगितले. (प्रतिनिधी)

महिन्याच्या मुदतीचे काय?एक महिन्याच्या आत ‘एलबीटी’ रद्द करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २३ नोव्हेंबरला दिले होते. या मुदतीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा स्थितीत त्यांच्या दाव्यांचे काय होणार, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच ‘एलबीटी’ रद्द करु, अशी ग्वाही दिली होती. परंतु महसूल मंत्र्यांच्या घोषणेनुसार आता राज्यातील व्यापाऱ्यांना आणखी चार महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.