शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

क्लासेससाठी कायदा

By admin | Updated: July 23, 2015 01:52 IST

राज्यातील कोचिंग क्लासेसवर कायद्याच्या माध्यमातून पायबंद घालण्यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, त्यासाठी

मुंबई : राज्यातील कोचिंग क्लासेसवर कायद्याच्या माध्यमातून पायबंद घालण्यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, त्यासाठी विधी व न्याय विभागाशी बोलणे सुरू आहे. पालकांकडून लाखो रुपये फी उकळणाऱ्या क्लासेसवर या कायद्याद्वारे आळा घालता येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.मुंबईतील खासगी कोचिंग क्लासेसबाबत ‘लोकमत’ने केलेले स्टिंग आज विधानसभेत चांगलेच गाजले. ‘लोकमत’ने अशा क्लासेसबाबत मांडलेले वास्तव विदारक असून विद्यार्थी व पालकांची फसवणूक होते, असा चर्चेचा सूर होता. आ. सरदार तारासिंह, अमित साटम, शरद सोनवणे, सुनील राऊत यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. क्लासेसच्या नावाखाली वारेमाप लूट केली जाताना महाविद्यालयांनादेखील हाताशी धरले जाते. तुम्ही क्लासेसना जा, तुमची हजेरी लावली जाईल, असेही काही क्लासेसवाले सांगतात. अशा क्लासेस आणि महाविद्यालयांंचे हितसंबंध उघडकीस आणले जातील आणि त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील सदस्य सर्वश्री शरद सोनावणे, पृथ्वीराज चव्हाण, मेधा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.शाळा-कॉलेजांना डिसेंबरपर्यंत परवानगी!मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन यापुढे नव्या शाळा, महाविद्यालयांना डिसेंबर महिन्यापर्यंतच परवानगी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. यापूर्वीची जूनपर्यंत परवानगी देण्याची पद्धत बंद करण्यात येईल, असेही त्यांनी प्रश्नोत्तरांच्या वेळी स्पष्ट केले.नाशिकमधील मालेगाव येथील रमजानपुरा परिसरात नवीन उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबतचा प्रश्न आमदार असिफ शेख, राहुल बोंद्रे, अस्लम शेख, दिलीप वळसे-पाटील, अब्दुल सत्तार, नसीम खान यांनी विचारला होता.तावडे म्हणाले, की शाळा, महाविद्यालयांना देण्यात येणारी परवानगी चालू वर्षात डिसेंबरपर्यंत दिली गेल्यास नवीन शैक्षणिक वर्षात त्या शाळा, महाविद्यालयांना याबाबत पुढील वेळापत्रक राबविण्यास मदत होईल. शाळा-महाविद्यालयांना डिसेंबरपूर्वी परवानगी देण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल करावे लागणार आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत सुधारित विधेयक मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागामध्ये नवीन उर्दू माध्यमांच्या माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यासंदर्भात माध्यमिक शाळांची गरज असणारी ठिकाणे निश्तिच करण्यात आली आहेत. त्यानुसार अशा ठिकाणी शाळेस परवानगी मिळण्याकरिता इच्छुक असलेल्या पात्र शैक्षणिक संस्थांकडून आॅनलाइन पद्धतीत अर्ज मागविण्यात आले आहेत. शहरी भागाकरितादेखील उर्दू माध्यमांच्या माध्यमिक शाळांची गरज असणारी ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.