शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

ललिता पंचमीला अंबाबाई गजारूढ रूपात

By admin | Updated: September 29, 2014 18:42 IST

दोन जिवलग सखींची भेट आणि कोहळा भेदण्याचा विधी आज, सोमवारी ललिता पंचमीला संपन्न झाला. यानिमित्त शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केल्यानंतर साजरा झालेल्या विजयोत्सवात तिची प्रिय सखी देवी त्र्यंबोलीचे मात्र विस्मरण होते. तिचा रूसवा काढण्यासाठी स्वत: अंबाबाई आपल्या शाही लव्याजम्यानिशी तिच्या भेटीला जाते. दोन जिवलग सखींची भेट आणि कोहळा भेदण्याचा विधी आज, सोमवारी ललिता पंचमीला संपन्न झाला. यानिमित्त शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. त्यामुळे सकाळी दहा वाजता शासकीय अभिषेक झाल्यानंतर अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. अंबाबाईने कोल्हासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. त्या कार्यात तिला सखी त्र्यंबोली देवीनेही कामाक्षाचा वध करून तिला सहकार्य केले. मात्र, अंबाबाईच्या विजयोत्सवात त्र्यंबोलीला बोलावणे राहून जाते. त्यामुळे त्र्यंबोलीदेवी अंबाबाईवर रूसून तिच्याकडे पाठ करून बसते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोलीचा रूसवा काढण्यासाठी जाते. यावेळी देवी त्र्यंबोलीने तू कोल्हासुराचा वध कसा केलास, ते मला दाखव अशी इच्छा व्यक्त करते. त्यानुसार अंबाबाई कोल्हासुराचे प्रतीक म्हणून कोहळ््याचा भेद करून त्याचा वध कसा केला ते दाखवते. या कथा भागानुसार दरवर्षी ललिता पंचमीला अंबाबाईची पालखी त्र्यंबोलीच्या भेटीला जाते व तेथे कोहळा भेद हा विधी होतो. त्र्यंबोलीच्या भेटीला गजारूढ होऊन अंबाबाई जाते म्हणून यादिवशी ही पूजा बांधली जाते. श्रीपूजक सागर मुनीश्वर व रवी माईणकर यांनी ही पूजा बांधली.