शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचा तुटवडा

By admin | Updated: August 20, 2014 01:10 IST

घरगुती सिलिंडरचा तुटवडा असल्याने सणासुदीच्या तोंडावर नागरिकांचे हाल सुरू आहेत. सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना दाही दिशा फिरावे लागत असून गॅस एजन्सींच्या कार्यालयाबाहेर

ग्राहक वेटिंगवर : काळ्याबाजारात दर हजारावर!नागपूर : घरगुती सिलिंडरचा तुटवडा असल्याने सणासुदीच्या तोंडावर नागरिकांचे हाल सुरू आहेत. सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना दाही दिशा फिरावे लागत असून गॅस एजन्सींच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी होत आहे. काळ्या बाजारात सिलिंडर हजारावर मिळत असल्याची धक्कादायक माहिती आहे. यासंदर्भात प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी ग्राहकांची मागणी आहे. सिलिंडरचा काळाबाजारएचपीसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या भटिंडा येथील रिफायनरीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर रिफिलिंगसाठी आवश्यक बल्कचे उत्पादन कमी झाले आहे. याशिवाय नवीन सिलिंडरचाही पुरवठा कमी असल्याची माहिती आहे. छुप्यारीतीने चालणारा गॅसचा काळाबाजार टंचाईमुळे आता उघड उघड सुरू आहे. सामान्य माणसाला घरगुती वापराच्या गॅससाठी दररोज एजन्सीच्या दुकानात हेलपाटे मारावे लागत आहेत. ‘गाडी आली नाही’ असे सांगून सिलिंडर नाकारले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून महिला वर्ग वैतागला आहे. ओळखी काढून सिलिंडर मिळावे म्हणून ग्राहकांचा आटापिटा सुरू आहे. गॅस एजन्सींनी आपले मनमानी धोरण राबवून ग्राहकांची अडवणूक सुरू केली असून त्याला नियंत्रण बसायला हवे, असे मत एका ग्राहकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केले. वाहनांमध्ये घरगुती गॅसघरगुती ग्राहकांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसताना वाहनधारक व व्यावसायिक वापरासाठी मात्र या गॅसचा सर्रास उपयोग सुरू असल्याचे दिसून येते. शहरात गॅसचे पंप फार कमी आहेत. या तुलनेत गॅसवर धावणाऱ्या गाड्या जास्त आहेत. जीवनावश्यक कायद्यांतर्गत स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस वाहनांमध्ये वापरता येत नाही. ुसिलिंडरची मागणी वाढलीनागपुरात सर्वाधिक ग्राहक हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे आहेत. याच कंपनीच्या सिलिंडरचा सर्वाधिक तुटवडा आहे. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला. भारत, एचपी व इंडेन गॅस कंपन्यांकडे हजारो सिलिंडरची बुकिंग पेडिंग आहेत. पुरेसा लोड (एक ट्रक ३०६ सिलिंडर) येत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले.आॅगस्टमध्ये रमजान ईद आणि श्रावण महिना सुरू असल्याने सिलिंडरची मागणी अचानक वाढली. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने वेटिंग वाढत गेले. आॅनलाईन बुकिंग करूनही सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांची भटकंती सुरू आहे. लोकांच्या अडचणीची दखल एजन्सीकडूनही घेतली जात नसल्यामुळे अनेक कुटुंबांना त्याची झळ बसली आहे. दुसरीकडे अनेक टपरीचालक, चहाची दुकाने, कॅन्टीन, उपाहारगृह आणि हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा उघड वापर केला जात आहे. (प्रतिनिधी)