शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेचे असहकार्य!

By admin | Updated: May 30, 2014 02:06 IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनचा भीषण अपघात अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी करीत आहेत. मात्र, चौकशीस कोकण रेल्वेकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनचा भीषण अपघात अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी करीत आहेत. मात्र, चौकशीस कोकण रेल्वेकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे चौकशीला विलंब होत आहे. दरम्यान याविषयी कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलणे टाळले. नागोठणे-रोहादरम्यान दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला नुकताच अपघात झाला होता. या अपघातात २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण जखमी झाले. अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. त्यानुसार, या अपघाताची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत रेल्वे पोलीस, कर्मचारी आणि प्रवासी असे ३0 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र, अपघाताची माहिती मध्य आणि कोकण रेल्वेकडून मिळणे गरजेचे असल्याने तशी माहिती देण्याच्या सूचना आयुक्त बक्षी करीत आहेत. मध्य रेल्वेकडून चौकशी पूर्ण करण्यासाठी लागणारी माहिती दिली असून कोकण रेल्वेकडून अद्याप काही माहिती येणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही जबाबदारी पाडली जात होती की नाही आणि इतर काही माहिती मागितली आहे. मात्र, ती अद्यापही मिळाली नसल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त बक्षी यांनी सांगितले. आतापर्यंत चौकशीच्या पाच फेर्‍या झाल्या असून यामध्ये तीन वेळा त्यांना माहिती देण्याबाबत पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, तरीही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची खंत बक्षी यांनी व्यक्त केली. आता कोकण रेल्वेने चौकशीला मदत होईल, अशी माहिती लवकरच देऊ, असे आश्वासन दिले असून त्यांच्याच प्रतिसादाची आम्ही वाट पाहत असल्याचे ते म्हणाले.