शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या मालाअभावी ‘कोल्हापुरी’ला घरघर

By admin | Updated: May 8, 2015 00:27 IST

उद्योग नामशेष होण्याची भीती : चामड्याच्या किमतीत मोठी वाढ; ३५ ते ४० हजार कारागिरांचा प्रश्न

भारत चव्हाण = कोल्हापूर -वेगवेगळ्या कारणांनी कच्च्या मालाचा होत असलेला अपुरा पुरवठा आणि सतत वाढत असलेले चामड्यांचे दर याचा परिणाम ‘कोल्हापुरी चप्पल’ उद्योगावर झाला असून, भविष्यकाळात यावर नियंत्रण न ठेवले गेल्यास कोल्हापुरी चप्पल उद्योग नामशेष होण्याची भीती व्यावसायिकांतून व्यक्त केली जात आहे. सध्या या व्यवसायातील उलाढाल मंदावली असल्याने त्यावर अवलंबून असणारे जिल्ह्यातील ३५ ते ४० हजार कारागीर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. जनावरांचे कातडे कमावून त्यापासून कोल्हापुरी चप्पल तयार केले जाते. कोल्हापुरात पूर्वी पारंपरिक पद्धतीने जनावरांची कातडी कमावण्याचे उद्योग होते; पण आता यांत्रिक प्रक्रिया पुढे आली. परंतु ही खर्चिक प्रक्रिया आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई यांमुळे हे उद्योग बंद पडले. त्यामुळे कोल्हापूरच्या कारागिरांना चेन्नई, कोलकाता येथून चामडी आणावी लागत आहेत. स्वाभाविकपणे त्यांच्या वाहतुकीचा खर्च वाढल्याने चामड्यांचे दर आधीपासूनच वाढले आहेत. चामड्यावर केली जाणारी रासायनिक प्रक्रिया अलीकडील काळात मोठी खर्चिक बनली असल्याने त्याचा परिणाम चामड्याचे दर वाढण्यात होत आहे. गेल्या महिन्यात चामड्यांचे जे दर होते, त्यात तब्बल किलोमागे ३५ ते ४० रुपयांची वाढ झाली. कच्च्या मालाचे दर वाढल्याने चपलांच्या किमतीही वाढत आहेत. स्वाभाविक चपलांच्या किमती परवडत नसल्याने ग्राहकांनीही ‘कोल्हापुरी’कडे पाठ फिरविली आहे. पूर्वीसारखी विक्री होत नाही. त्याचा फटका कारागिरांना बसला आहे. कोल्हापुरात ३५ ते ४० हजार कारागीर असून चपलांचा व्यापार करणारे चार ते पाच हजार व्यापारी आहेत. या सर्वांच्या मिळकतीवर परिणाम जाणवू लागला आहे.कडक नियमांचा फटका कोल्हापूर शहरात १९९० च्या सुमारास चामडी कमावण्याचे ६८ उद्योग होते. त्यांत एक रासायनिक प्रक्रिया करणारा कारखाना होता. पारंपरिक पद्धतीने चामडी कमावण्याची प्रक्रिया केली जात होती. त्यासाठी हिरडा, बेहडा, चुना व बाभूळ यांचा वापर केला जात होता. मात्र, सांडपाणी पक्रिया केंद्र सुरू करण्याच्या अटीमुळे हे उद्योग शहरातून हद्दपार झाले. काही वर्षांपर्यंत चार उद्योग होते, तेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले. तेथूनच कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडायला सुरुवात झाली. ३५० कोटींची उलाढाल कोल्हापुरीला असलेली मागणी आणि त्याचा व्यवसाय विस्तार पाहता प्रत्येक महिन्याला २५ ते ३० कोटींचा व्यवसाय कोल्हापुरात होतो. त्याची वार्षिक उलाढाल ३०० ते ३५० कोटींच्या घरात जाते. पूर्वी हीच उलाढाल मोठी होती; परंतु व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना न केल्यामुळे दिवसेंदिवस ही उलाढाल कमी होत आहे, असा जाणकारांचा दावा आहे. कोल्हापुरी चप्पलला मोठी मागणी कोल्हापुरी चप्पलला देश-विदेशातील ग्राहकांची पसंती मिळाली आहे. या चपलांना त्यामुळे मुंबई, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता, कानपूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, गोवा येथून चांगली मागणी आहे. शिवाय देशाबाहेर इटली, अमेरिका, स्वित्झर्लंड, पॅरिस, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या देशांतही ‘कोल्हापुरी’ला अधिक मागणी आहे.