शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात महिलांची टोलवर तडी

By admin | Updated: November 21, 2014 02:22 IST

टोल देण्यास नकार देऊन पर्यायी मार्गाने जाणाऱ्या ट्रकचालकास टोल कर्मचाऱ्यांनी बुधवारी केलेल्या मारहाणीचे

कोल्हापूर : टोल देण्यास नकार देऊन पर्यायी मार्गाने जाणाऱ्या ट्रकचालकास टोल कर्मचाऱ्यांनी बुधवारी केलेल्या मारहाणीचे पडसाद गुरुवारी सकाळी कळंबा टोलनाक्यावर उमटले. टोलविरोधी कृती समितीतील महिलांनी रुद्रावतार धारण करत नाक्यावरील कर्मचाऱ्यांना चोप दिला आणि प्लॅस्टिकचे बॅरिकेट्सही फेकून दिले. या प्रकारामुळे कर्मचारी तेथून पसार झाले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग होऊन टोलवसुली बंद झाली.‘कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती’ने नितीन राजाराम चव्हाण (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) या ट्रकचालकाला मारहाण करणाऱ्या संशयितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद ढोमे यांच्याजवळ केली. आणि चव्हाण यांच्यासह सर्व जण पोलीस ठाण्यात पुन्हा फिर्याद देण्यासाठी गेले. त्यानंतर वातावरण निवळले. बुधवारी दुपारी ट्रकचालक नितीन चव्हाण टोलनाक्यावरून जात होता. त्याने टोल देण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला पर्यायी मार्गाने जाण्यास सांगितले. या वेळी ट्रकचालक व कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. यामधून त्यांनी चव्हाणला मारहाण केली.