Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:56 IST2025-10-17T15:54:55+5:302025-10-17T15:56:02+5:30
Kolhapur Crime News: कोल्हापूरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील महिला सुधारगृहामध्ये असलेल्या सहा नृत्यांगनांना सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या सर्व नृत्यांगनांनी आपल्या हाताच्या नसा कापून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
कोल्हापूरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील महिला सुधारगृहामध्ये असलेल्या सहा नृत्यांगनांना सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या सर्व नृत्यांगनांनी आपल्या हाताच्या नसा कापून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही घटना उघडकीस येताच प्रशासनाने धावपळ करून सर्व महिला नृत्यांगनांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सध्या महिला सुधारगृहात असलेल्या या सह नृत्यांगनांना पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईदरम्यान, ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची रवानगी महिला सुधारगृहामध्ये करण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळच्या सुमारास सहा नृत्यांगनांनी आपल्या हाताची नस कापून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने प्रसंगावधान दाखवत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. आता या नृत्यांगनांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पण या नृत्यांगनांनी सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न का केला, याबाबतचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.