शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

निद्रिस्त ‘खाकी’ अन भयभीत अकोलेकर!

By admin | Updated: July 23, 2014 00:52 IST

पोलिस ‘टाइट’, परिस्थिती वाईट

अकोला: शहरात गावगुंड, खंडणी बहाद्दर, चोर, घरफोडे, लुटारूंनी हैदोस घातला असताना, नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलिस कितपत जागरुक असतात, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न 'लोकमत' चमूने शनिवारी आणि रविवारी रात्रभर फिरून केला असता अत्यंत भीषण अन् धक्कादायक वास्तव समोर आले. बहुतांश पोलिस कर्मचारी ड्युटीच्या वेळेत झोपा काढत असल्याचे, यावेळी निदर्शनास आले. सरकार या कर्मचार्‍यांना झोपा काढण्याचा पगार देते की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सामान्य नागरिक ज्यांच्या भरवश्यावर रात्रीची झोप निर्धास्तपणे घेतात, ती पोलिस यंत्रणा रात्रभर किती सतर्क असते, हे जाणून घेण्यासाठी लोकमत चमूने शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री १ वाजतापासून पहाटे ५ वाजेपर्यंत शहरातील जुने शहर, सिटी कोतवाली, रामदास पेठ, खदान, सिव्हिल लाईन्स आणि आकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेरफटका मारला. या पाहणीच्या वेळी सामान्य नागरिकांप्रमाणेच पोलिसही झोपलेलेच आढळून आले. शहरातील बहुतांश पोलिस चौक्या बंद असल्याचे यावेळी आढळून आले. वास्तविक, पोलिस यंत्रणा २४ तास, त्यातही रात्रीच्यावेळी जास्त सतर्क असणे, अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र पोलिस ना पोलिस चौक्यांमध्ये दिसले, ना रस्त्यांवर. पोलिस यंत्रणेचा कारभार आणि दिवसागणिक ढासळत असलेली अकोल्याची कायदा व सुव्यवस्था परिस्थिती पाहीली तर, अकोला पोलिस दलात 'शुद्धीकरण मोहीम' राबविणे अत्यावश्यक आहे, यावर यानिमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.