भाजपच्या पहिल्या यादीत खडसे यांचे नावच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:56 PM2019-10-01T14:56:20+5:302019-10-01T14:57:06+5:30

यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच नाव आलेलं नाही. अस असताना देखील खडसे यांनी आपला उमेदवारी आज मुक्ताईनगर मतदारसंघातून भरला.

Khadse's name not in BJP's first list! | भाजपच्या पहिल्या यादीत खडसे यांचे नावच नाही !

भाजपच्या पहिल्या यादीत खडसे यांचे नावच नाही !

Next

मुंबई - भारतीय जनता पक्षाने आज विधानसभा निवडणुकीसाठीच्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून बहुतांशी जुन्या चेहऱ्यांवर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. मात्र यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच नाव आलेलं नाही. अस असताना देखील खडसे यांनी आपला उमेदवारी आज मुक्ताईनगर मतदारसंघातून भरला.

भाजपने आज जळगाव जिल्ह्यातील सातपैकी सहा जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. केवळ मुक्ताईनगर मतदार संघातील उमेदवाराचे नाव मागे ठेवण्यात आले आहे. या मतदार संघातून खडसे प्रतिनिधीत्व करतात. पहिल्या यादीत त्यांचे नाव न आल्यामुळे मतदार संघात चर्चांना उधाण आले आहे. तर पुढील यादीत त्यांचे नाव येईल अशी आशा त्यांचे समर्थक व्यक्त होत आहे.

दरम्यान असं असलं तरी एकनाथ खडसे यांनी हार मानली नसून त्यांनी आजच मुक्ताईनगर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आपण लढणार हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीरच केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदार संघातून हरीभाऊ बागडे यांना वयामुळे उमेदवारी नाकारण्यात येणार होती. परंतु, त्यांनी आपण निवडणूक लढवणारच असं नमूद केल्यामुळे त्यांचे नाव पुन्हा यादीत सामील झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 

 

Web Title: Khadse's name not in BJP's first list!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.