शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात मिळणार भाडोत्री कृषी अवजारे !

By admin | Updated: October 7, 2014 21:54 IST

७० कोटींचा निधी : शेतकऱ्यांना नाममात्र भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार

म्हाकवे : शिक्षण व औद्योगीकरणामुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे शेतीच्या कामांना दिरंगाई होऊन त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कर्नाटक शासनाने शेतीउपयोगी अवजारे खरेदी करून ती शेतकऱ्यांना नाममात्र भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याच्या संकल्प केला आहे. यासाठी राज्यात १८६ केंद्रे सुरू करण्यात येणार असून, या केंद्रांमार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ७० कोटी रुपयांचा निधीही निश्चित केला आहे. शेतीच्या उत्पादनवाढीमध्ये शेतमजूर हा घटक महत्त्वपूर्ण आहे; परंतु वाढत्या औद्योगिक वसाहती, छोटे-मोठे उद्योगधंदे, शहरांत जाणारा लोंढा यांमुळे शेती करणे अवघड झाले असून, शेतकऱ्यांसमोर यक्षप्रश्न उभे आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीमध्ये शेती टिकविण्यासाठी यांत्रिकीकरणाची कास धरणे गरजेचे आहे.  राज्याच्या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करणाऱ्या कर्नाटक शासनाने शेतकऱ्यांना विविध शेती अवजारे नाममात्र भाडेतत्त्वावर देण्याचाही महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे. प्रत्येक ग्राहक केंद्रास ७५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, आदी अवजारे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. दरम्यान, कृषी उत्पादनवाढीसाठी जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापनाकरिता आवश्यक ती माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी कर्नाटक शासनाने राज्यातील कृषी विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. यामुळेही कृषी उत्पादनात किमान १५ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, अशी आशाही शासनाच्या कृषी विभागाला वाटते.सूक्ष्म सिंचनासाठीही निधी वाढविणारकर्नाटक राज्यात उसासारख्या नगदी पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या पिकाला पाण्याची गरज जास्त असते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनवाढीसाठी ठिबक, तुषार, आदी सूक्ष्म सिंचनावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात सूक्ष्म सिंचनासाठी अधिक निधी उपलब्ध करण्याचा मानसही कर्नाटक शासनाच्या कृषी विभागाने केला आहे.