शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत धूमस्टाईल चोरी

By admin | Updated: December 26, 2014 04:19 IST

कल्याण-डोंबिवली शहरात चोरट्यांचा हैदोस चालूच असून रिक्षातून प्रवास करणाऱ्या स्मिता इंगळे महिलेला लक्ष्य करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री कल्याण शहरात घडली

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात चोरट्यांचा हैदोस चालूच असून रिक्षातून प्रवास करणाऱ्या स्मिता इंगळे महिलेला लक्ष्य करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री कल्याण शहरात घडली. या वेळी झालेल्या झटापटीत ही महिला रिक्षातून खाली पडल्याने तिच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. इंगळे या सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, त्या अंधेरी येथे कामाला आहेत. कल्याणमधील रामबाग परिसरात राहणाऱ्या इंगळे बुधवारी रात्री कामावरून घरी येण्यासाठी निघाल्या. कल्याण रेल्वे स्थानक गाठल्यानंतर त्यांनी घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. घराच्या दिशेने येत असताना रामबाग लेन ४मधील गुरुनानक शाळेजवळ धूम स्टाइलने रिक्षाच्या मागून येणाऱ्या मोटारसायकलवरील चोरट्यांनी त्यांच्या हातातील पर्स खेचून पलायन केले. अचानक घडलेल्या घटनेने त्या गडबडून गेल्या आणि या झटापटीत त्या रिक्षातून खाली पडल्या. या घटनेत त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या वाढत्या घटनांनी महिलावर्गात घबराटीचे वातावरण पसरले असून आता या घटनांमध्ये जिवावर बेतण्यासारखे प्रसंग घडू लागल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे. या चोरीच्या घटनांवर पोलिसांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, हे या घटनांमधून समोर आले आहे. (प्रतिनिधी)