ज्योत्स्ना दर्डा यांना ‘स्वरज्योती’तून श्रद्धांजली

By Admin | Updated: March 19, 2015 22:39 IST2015-03-19T22:39:12+5:302015-03-19T22:39:12+5:30

महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकमत सखी मंचा’ची स्थापना करणाऱ्या स्व. ज्योत्स्ना दर्डा यांचा २३ मार्च रोजी द्वितीय पुण्यस्मरण दिन आहे.

Jyotsna Darda tribute to 'Swarajyoti' | ज्योत्स्ना दर्डा यांना ‘स्वरज्योती’तून श्रद्धांजली

ज्योत्स्ना दर्डा यांना ‘स्वरज्योती’तून श्रद्धांजली

पुणे : महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकमत सखी मंचा’ची स्थापना करणाऱ्या स्व. ज्योत्स्ना दर्डा यांचा २३ मार्च रोजी द्वितीय पुण्यस्मरण दिन आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘स्वरज्योती’ या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या भक्तिरसपर गीतांना अमर ओक यांच्या बासरीवादनाचा साज चढणार आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या असेम्ब्ली हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मिलिंद कुलकर्णी निवेदन करणार आहेत.
सखी मंचाच्या माध्यमातून राज्यात अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक कलाकार या माध्यमातून प्रकाशात आले आहेत.
दोन वर्षांपूर्वी ज्योत्स्ना दर्डा यांचे दु:खद निधन झाले. मात्र, सखी मंचाच्या राज्यातील हजारो सदस्यांच्या मनात त्यांच्या विचारांची ज्योत तेवत आहे. ‘स्वरज्योती’ कार्यक्रमाच्या निमित्ताने सखी मंच सदस्यांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)

४महिलांचे मनोबल उंचावत, त्यांचा आत्मविश्वास जागवीत निश्चयाचे बळ त्यांच्या मनात दृढ करण्यासाठी ज्योत्स्ना दर्डा यांच्या कल्पनेतून १९९९ मध्ये ‘लोकमत सखी मंचा’ची स्थापना झाली. सखी मंचाच्या राज्यात दीड लाखाहून अधिक सभासद असून, देशातील महिलांसाठी असणारे हे सर्वाधिक मोठे व्यासपीठ आहे.

Web Title: Jyotsna Darda tribute to 'Swarajyoti'