शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरीय रेल्वेचा प्रवास दिसणार ‘बीबीसी’वर

By admin | Updated: September 26, 2014 03:20 IST

कुलाबा ते ठाणे धावलेली पहिली ट्रेन, सीएसटी सारखे असलेली वर्ल्ड हेरिटेज वास्तू आणि आता वाढलेला उपनगरीय रेल्वेचा पसारा.

मुंबई : कुलाबा ते ठाणे धावलेली पहिली ट्रेन, सीएसटी सारखे असलेली वर्ल्ड हेरिटेज वास्तू आणि आता वाढलेला उपनगरीय रेल्वेचा पसारा. ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसी या जगभरात दिसणाऱ्या टेलिव्हीजनवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा दिसणार आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवर बीबीसीकडून माहीतीपट बनवण्यात येणार असून मध्य रेल्वे मार्गावर नोव्हेंबर महिन्यात चित्रीकरण केले जाणार आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात बीबीसीवर माहीतीपट प्रसारीत केले जाईल.१८५३ साली पहिली ट्रेन मध्य रेल्वे मार्गावरुन धावली आणि त्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेचा पसारा हळूहळू वाढत गेला. इंग्रजांच्या काळात बनलेल्या मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या सीएसटीमधूनच रेल्वेच्या कामाचा गाडा हाकला जात होता. तो आजही याच मुख्यालयातून सुरुच आहे. अशा या वास्तूला आता वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. या वास्तूला अनेक परदेशी पर्यटकही भेट देतात आणि आपल्या कॅमेऱ्यात या वास्तूला टिपतात. या वास्तूबरोबरच परदेशी पर्यटकांना हेवा वाटतो तो शहर आणि उपनगरात परसलेल्या लोकलचा. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. तर एकट्या मध्य रेल्वेवरुन जवळपास ४२ ते ४५ लाख प्रवासी प्रवास करतात. जवळपास दीड हजार लोकल फेऱ्यांतून हा प्रवास होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. मोठ्या प्रमाणात पसरलेल्या रेल्वेचा हा पसारा चित्रीत करण्यासाठी ‘बीबीसी’ने ठरविले असून त्याचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यात केले जाणार आहे. यासाठी बीबीसीच्या पाच टिम मुंबईत येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी सांगितले. मार्च किंवा एप्रिल महिन्यात बीबीसीवर प्रसारीत केली जाणार आहे. त्याचे चार भाग प्रसारीत होणार असून प्रत्येक भाग एक तासांचा असणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)