शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोकणवासीयांचा प्रवास लांबला

By admin | Updated: August 28, 2014 03:14 IST

मालगाडीचे डबे करंजाडीजवळ घसरल्यानंतर गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर सलग चौथ्या दिवशीही विघ्न आले

मुंबई/डोंबिवली : मालगाडीचे डबे करंजाडीजवळ घसरल्यानंतर गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर सलग चौथ्या दिवशीही विघ्न आले. करंजाडीजवळ धीम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या आणि त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास लांबत होता. त्याचा फटका चाकरमान्यांना बसत असल्याने स्थानकांबरोबरच ट्रेनलाही प्रचंड गर्दी होऊ लागली आणि या गर्दीमुळे काही ठिकाणी प्रवाशांचा उद्रेक पाहण्यास मिळाला. गुरुवारीही थोड्या प्रमाणात ट्रेन उशिराने धावू शकतात, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. २४ आॅगस्ट रोजी वीर ते करंजाडीजवळ मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि या मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीला मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली. या परिसरात ५00 मीटरपर्यंत रेल्वे ट्रॅकला मोठा फटका बसल्याने ट्रॅक, स्लीपर आणि सिग्नल यंत्रणेचे काम हाती घेण्यात आले. हे काम हाती घेतानाच रेल्वे सेवा सुरूच ठेवण्यात आली. मात्र दुरुस्ती कामामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांंना फटका बसतच गेला. सोमवार आणि मंगळवारी या मार्गावरील ट्रेन तब्बल दहा तास उशिराने धावत असतानाच बुधवारी या मार्गावरील ट्रेन सुरळीत होतील, असे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र बुधवारीही जैसे थे परिस्थिती दिसून आली. कोकण मार्गावरील ट्रेन अनियोजित वेळेनुसार धावत असल्याने काही स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. ज्या गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले होते त्यांना तर प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. आरक्षित डब्यात अनारक्षित प्रवाशांकडून जागा अडवण्यात येत होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये वादविवाद होत होते. ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे अनेक ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या. कोकणकन्या, राज्यराणी, सीएसटी ते करमाळी, सीएसट-मडगाव, मांडवी, मेंगलोर यासह अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)