Jitendra Awhad: 'विनयभंग?' जितेंद्र आव्हाडांवरील आरोपांवरून अंजली दमानियांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:00 PM2022-11-14T12:00:03+5:302022-11-14T12:01:14+5:30

Anjali Damania Reaction on Jitendra Awhad: काही वेळापूर्वीच आव्हाड यांची पत्नी ऋता सामंत यांनी देखील भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendra Awhad: 'molestation?' Anjali Damania's tweet on allegation on Jitendra Awhad's by Women | Jitendra Awhad: 'विनयभंग?' जितेंद्र आव्हाडांवरील आरोपांवरून अंजली दमानियांचे ट्विट

Jitendra Awhad: 'विनयभंग?' जितेंद्र आव्हाडांवरील आरोपांवरून अंजली दमानियांचे ट्विट

Next

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जितेंद्र आव्हाड आणि हर हर महादेव शो बंद पाडण्याच्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले आहे. आज सकाळीच आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या नव्या प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ, रस्ता अडविण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर आता अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया आली आहे. 

Jitendra Awhad Video: जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप; घटनेचा व्हिडीओ समोर आला, नेमके काय? 

पोलिसांनी आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसंच लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटले आहे. 

दमानिया काय म्हणाल्या...
विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा आहे, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे. 

काही वेळापूर्वीच आव्हाड यांची पत्नी ऋता सामंत यांनी देखील भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. "जे काही घडलं ती Spontaneous Reaction होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही" असं म्हटलं आहे. ऋता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?
कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात येताना गर्दीत आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला देखील होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा संबंधित महिलेनं केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या ४० वर्षीय महिलेनं केला आहे. महिलेनं तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: Jitendra Awhad: 'molestation?' Anjali Damania's tweet on allegation on Jitendra Awhad's by Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.