Jay Pawar: अजितदादांचा अपघात की घातपात? जय पवारांनाही शंका, इन्स्टाग्राम स्टोरी तुफान चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:14 IST2026-02-19T08:13:49+5:302026-02-19T08:14:39+5:30

Jay Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल त्यांचे पुत्र जय पवार यांनी शंका व्यक्त केली.

Jay Pawar on Ajit Pawar Plane Crash: "It is impossible to easily destroy the black box, the public must know the truth" Jay Pawar is aggressive! | Jay Pawar: अजितदादांचा अपघात की घातपात? जय पवारांनाही शंका, इन्स्टाग्राम स्टोरी तुफान चर्चेत!

Jay Pawar: अजितदादांचा अपघात की घातपात? जय पवारांनाही शंका, इन्स्टाग्राम स्टोरी तुफान चर्चेत!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातावरून आता राजकारण चांगलेच तापू लागले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक नेत्यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केल्यानंतर, आता अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी या प्रकरणावर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. "विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत, मग सत्य बाहेर का येत नाही?" असा सवाल करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

"विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे", असे  जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे.

अजित पवार यांच्या अपघातानंतर राजकीय वातावरण आधीच संवेदनशील असताना, जय पवार यांच्या या विधानामुळे संशयाची सुई अधिक गडद झाली आहे. निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे, यावर त्यांनी ठाम मते मांडली आहेत. जय पवार यांच्या या मागणीनंतर आता सरकार आणि तपास यंत्रणा यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः व्हीएसआर कंपनीच्या तांत्रिक तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title : जय पवार ने अजित पवार की दुर्घटना पर सवाल उठाए; गहन जांच की मांग।

Web Summary : जय पवार ने अपने पिता अजित पवार के विमान दुर्घटना पर संदेह जताया और पारदर्शी जांच की मांग की। उन्होंने ब्लैक बॉक्स के आसानी से नष्ट होने पर सवाल उठाया और वीएसआर एयरलाइंस के रखरखाव प्रथाओं की जांच की मांग की, जिससे राजनीतिक तनाव बढ़ गया।

Web Title : Jay Pawar questions Ajit Pawar's accident; demands thorough investigation.

Web Summary : Jay Pawar raises doubts about his father Ajit Pawar's plane accident, demanding a transparent investigation. He questions the alleged easy destruction of the black box and calls for scrutiny of VSR airlines' maintenance practices, fueling political tensions.