शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

जे. डे हत्या प्रकरण: राजन टोळीविरूद्ध आरोप निश्चिती

By admin | Updated: June 9, 2015 04:29 IST

पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज विशेष मोक्का न्यायालयाने दहाजणांविरोधात आरोप निश्चित केले.

मुंबई : पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज विशेष मोक्का न्यायालयाने दहाजणांविरोधात आरोप निश्चित केले. त्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीच्या गँगस्टरसोबत महिला पत्रकाराचाही सहभाग आहे. आरोपींविरोधात छोटा राजनच्या संघटीत टोळीचे सदस्य आहेत, त्यांनी राजनच्या इशाऱ्यावरून डे यांची कट रचून हत्या केली आणि पुरावे नष्ट केले, या आरोपांनुसार खटला चालणार आहे. ११ जून २०११ रोजी पवई परिसरात डे यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेने या प्रकरणी राजन टोळीचा गँगस्टर सतीश तंगप्पन जोसेफ उर्फ सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरूण डाके, सचीन गायकवाड, अनील वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश आगावणे, विनोद असरानी उर्फ विनोद चेंबुर, पॉल्सन जोसेफ, दिपक सिसोदीया आणि जीग्ना व्होरा यांना अटक केली. यापैकी जोसेफने डे यांच्यावर गोळया झाडल्या. विनोदने सतीशला डेची ओळख पटवून दिली. व्होराने छोटा राजनला डे यांचे तपशील पुरवले. सिसोदीयाने शस्त्रे गोळा केली, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली. छोटा राजन आणि नारायण बीश्त या दोघांना फरार आरोपी ठरविण्यात आले. तर विनोदचा आजारपणात मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधातील आरोपांची निश्चिती करण्यात आली नाही.डे आपल्याविरोधात बातम्या देतात, प्रतिस्पर्धी डी कंपनीशी त्यांचे चांगले संबंध आहेत, आपले तपशील डी कंपनीला देऊ शकतात असा संशय राजनला होता. त्यामुळे राजनने डे यांची हत्या करण्याचे ठरविले होते.