शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

इंदिरा गांधी - करीम लाला भेटीबद्दल संजय राऊत बोलले ते खरं आहे का?; फडणवीसांचे काँग्रेसला पाच प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 1:05 PM

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट होत असल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देइंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट होत असल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा संजय राऊतांनी केलेल्या खुलाशाच्या आधारावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. करीम लालासारख्या अंडरवर्ल्ड डॉनला भेटण्यासाठी इंदिरा गांधी येत होत्या का?

मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट झाल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा संजय राऊतांनी केलेल्या दाव्याच्या आधारावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस पार्टीचे नवे सहयोगी ज्यांनी काँग्रेस पार्टीबरोबर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांपैकी एक असलेल्या संजय राऊतांनी केलेला खुलासा धक्कादायक आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत. स्वर्गीय इंदिराजी या मुंबईतल्या पायधुणीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायला येत होत्या. यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. काँग्रेस पक्षानं हे खरं आहे का ते सांगावं, असं आव्हानच फडणवीसांनी काँग्रेसला दिलं आहे. करीम लालासारख्या अंडरवर्ल्ड डॉनला भेटण्यासाठी इंदिरा गांधी येत होत्या का?, जर अशा प्रकारची भेट होत होती, तर काँग्रेस पार्टी अशा प्रकारच्या अंडरवर्ल्डच्या भरवशावर निवडणुका जिंकत होती का?, काँग्रेस पार्टीला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होता का?, असे प्रश्न आता देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेस पार्टी अंडरवर्ल्डच्या मसल पॉवरवर या ठिकाणी निवडणुका जिंकत होती का?, अशा अनेक शंका आणि प्रश्न आता उपस्थित झाले असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

इंदिरा गांधींविषयीच्या संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्वाचे मौन

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला

छोटा शकील, दाऊद हे महाराष्ट्रातलं राज्य चालवायचे हे खरंय का?, याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. 1960 ते 1980 या दोन दशकांमध्ये मुंबईच्या पोलीस कमिश्नरची अपॉइंटमेंट अंडरवर्ल्ड करायचा, या खुलाशावरही काँग्रेसनं उत्तर द्यायला हवं. अशाच प्रकारे अंडरवर्ल्डच्या माध्यमातून सीपींची नेमणूक व्हायची, याबद्दल खुलासा केला पाहिजे. हाजी मस्तान आणि अंडरवर्ल्डची लोक मंत्रालयात यायची आणि सेलिब्रिटींसारखं त्यांचं स्वागत केलं जायचं हे खरं आहे का? यावरही काँग्रेसनं स्पष्टीकरण द्यावं.काँग्रेस पक्ष यासंदर्भात खुलासा करणार आहे का?, महाराष्ट्रात जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालं, त्याची सुरुवात त्या काळापासून झाली का?, महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेला याची उत्तरं हवी आहेत. काँग्रेस पार्टी इतकी लालची झाली आहे, की आता त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांवर टीका झाल्यानंतरही त्यांच्याकडून कोणीही अधिकृतरीत्या मोठी व्यक्ती बोलायला तयार नाही. कोणी त्याचा निषेध करायला तयार नाही. त्यासंदर्भात कोणी खुलासा करायला तयार नाही. त्यांची सत्ता त्यांना लखलाभ असो, पण महाराष्ट्र आणि देशाला या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेस