शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 18:19 IST

BJP Criticize Raj Thackeray: राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का? असा प्रश्न पडला आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  लगावला आहे. 

मतदार याद्यांमधील घोळ आणि बोगस मतदानाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने काल मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढून निवडणुकीतील गैरप्रकारांविरोधात जोरदार आवाज उठवला होता. या मोर्चाला संबोधित करताना मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मतचोरीची काही उदाहरणंही पुराव्यासह समोर मांडली होती. त्यावरून आता भाजपानेराज ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का? असा प्रश्न पडला आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  लगावला आहे. 

याबाबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का? असा प्रश्न पडला आहे. ‘सत्याचा मोर्चा’ म्हणत काल जमलेल्या गर्दीसमोर बोलताना मात्र ते दुसऱ्यांदा ढळढळीत खोटं बोलले. सहा महिन्यांपूर्वीच वरळीतील डोम मध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीत त्यांच्या राजू पाटील या उमेदवाराला त्यांच्या १४०० मतदाराच्या गावात जिथे कायम मताधिक्य मिळायचे तिथे शून्य मते मिळाली. प्रत्यक्षात ही माहिती खोटी होती तिथे राजू पाटील यांनाच मताधिक्य होते.

केशव उपाध्ये पुढे म्हणाले की,  काल त्यांनी दुसरा खोटा सूर लावला! नवी मुंबई आयुक्ताच्या पत्त्यावर १३० मतदार नोंदवल्याचे सांगत त्यांनी सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल केली. कारण प्रत्यक्षात असे घडलेलेच नाही. लँडमार्क म्हणून ही माहिती नोंदवण्यात आली आहे. तसा स्पष्ट खुलासा ठाणे जिल्हाधिकाऱ्यानी केला आहे. राज ठाकरे यांच्या घराचा पत्ता शिवाजी पार्क आहे म्हणजे ते प्रत्यक्षात मैदानात रहातात का?  यश मिळवण्यासाठी सुरू असलेली पराभूतांची आणि राज ठाकरे यांची धडपड समजण्यासारखी आहे. पण त्यासाठी फेक नॅरेटीव चा आधार घ्याल तर जनताच फेक ठरवेल हे लक्षात घ्या, असा सल्लाही केशव उपाध्ये यांनी यावेळी दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Is Raj Thackeray competing with Rahul Gandhi in fake narratives?: BJP

Web Summary : BJP criticizes Raj Thackeray's claims about voter list discrepancies, accusing him of spreading falsehoods akin to Rahul Gandhi. BJP alleges Thackeray presented false information regarding voting irregularities during a recent rally, citing specific examples.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपा