शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

आयफोनला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण

By admin | Updated: June 13, 2015 02:15 IST

आयफोन, आयपॅड यासारखी अ‍ॅपलची उत्पादने बाजारात आणणाऱ्या फॉक्सकॉन या अांतरराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्याची

मुंबई : आयफोन, आयपॅड यासारखी अ‍ॅपलची उत्पादने बाजारात आणणाऱ्या फॉक्सकॉन या अांतरराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्याची तयारी दाखवली असून, या कंपनीचे प्रतिनिधी मंडळ येथे आल्यास सुयोग्य जागा व करसवलतीचे पॅकेज देण्याची तयारी उद्योग विभागाने ठेवली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.देसाई यांनी सांगितले की, अ‍ॅपलची अनेक उत्पादने फॉक्सकॉन कंपनी चीन व ब्राझीलमध्ये करते. आयफोनला भारतात प्रचंड मागणी आहे. या कंपनीच्या प्रतिनिधीने अलीकडेच आपली भेट घेऊन महाराष्ट्रात येण्याची इच्छा प्रकट केली. या कंपनीचे प्रतिनिधी मंडळ भारतात आल्यास त्यांना येथील औद्योगिक वसाहतीमधील जागा दाखवण्यात येतील. त्याचबरोबर मोठ्या उद्योगांना प्रोत्साहनात्मक बाब म्हणून उद्योग विभागाकडून देण्यात येणारे कर सवलतीचे व अन्य सुविधांचे पॅकेज फॉक्सकॉन कंपनीला देण्याची तयारी दाखवली आहे. या कंपनीचे प्रतिनिधी मंडळ येण्याची सध्या आम्ही वाट पाहत आहोत. मात्र याबाबत कुठलाही सहमती करार झालेला नाही. अ‍ॅपलच्या उत्पादनांची निर्मिती महाराष्ट्रात सुरू झाली तर आयफोन व आयपॅड स्वस्त होतील. (विशेष प्रतिनिधी)