शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भरतीप्रकरणी चौकशीचा फास

By admin | Updated: June 13, 2015 01:46 IST

सार्वजनिक आरोग्य विभागात अनेक वर्षांपासून बंधपत्रित आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू) म्हणून कार्यरत असलेल्यांना सेवेत कायम करण्यासाठी १ कोटी ११ लाख ५० हजार

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागात अनेक वर्षांपासून बंधपत्रित आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू) म्हणून कार्यरत असलेल्यांना सेवेत कायम करण्यासाठी १ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांची ‘मलाई’ खाल्ल्याची तक्रार शासनाकडे प्राप्त झाली. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी औरंगाबाद, बीड आणि अकोला विभागातील ६७ जणांची दिवसभर चौकशी केली. सार्वजनिक आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्ष प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. त्यानंतर दोन वर्षे प्राथमिक केंद्र अथवा अन्य शासकीय रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक आहे. पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी दोन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांना सेवेत नियमित न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना सेवेतून कमी करण्यास स्थगिती दिली होती. त्यांना सेवेत कायम घेण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेशही दिले होते. त्यानंतर शासनाने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात अध्यादेश काढला. मात्र त्यांना कायम करताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने आरोग्य मंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीनुसार, अध्यादेशासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा करण्यात आली. त्यातून जमा झालेले १ कोटी ११ लाख ५० हजार रुपये हे हिवताप संचालनालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते मंत्रालयातील सचिवापर्यंत अनेकांना देण्यात आले. त्यानंतर हा अध्यादेश काढण्यात आला. (प्रतिनिधी)