शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाच्या कागदपत्रांची माहिती एका क्लिकवर, सीईटी सेलकडून संकेतस्थळात नवे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:36 IST

सीईटी सेलमार्फत दरवर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. मात्र, अनेकदा प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची विद्यार्थ्यांना 

अमर शैला - 

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवेळी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ नव्या वर्षात कमी होणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागतील, तसेच त्यांचा नमुना कसा असेल, याची माहिती सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नवे बदल करण्यात आले आहेत. 

सीईटी सेलमार्फत दरवर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. मात्र, अनेकदा प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची विद्यार्थ्यांना 

माहिती नसते. तसेच विद्यार्थी जातीचे प्रमाणपत्र काढतात, मात्र जात वैधता अथवा नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र लागते, याची माहिती त्यांना नसते. त्यातून ऐनवेळी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना घाई करावी लागते अथवा त्यांच्यावर खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याची वेळ येते. तसेच सीईटी सेललाही विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी लागते. परिणामी, कॉलेज सुरू करण्याचे वेळापत्रकही कोलमडते. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच उपलब्ध करून दिली आहे. 

नव्या संकेतस्थळावर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणारा रकाना असणार आहे. त्यामध्ये आवश्यक असलेल्या प्रमाणपत्र यांची माहिती त्यात दिसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा करतानाची धावपळ कमी हाेणार आहे.

विद्यार्थ्यांकडे प्रवेशावेळी एखादे कागदपत्रे नसते. त्यातून विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्यामुळे प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतील, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी संकेतस्थळावर बदल केले आहेत. विद्यार्थी आतापासूनच कागदपत्रे मिळविण्याची तयारी करतील. त्यातून प्रवेश प्रक्रियेवेळी त्यांना ताण येणार नाही. प्रवेश प्रक्रियाही सुरळीत पार पडेल.    - दिलीप सरदेसाई,     आयुक्त, सीईटी सेल

प्रवर्गनिहाय माहिती दिसणार-     प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देणारा रकाना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.-     यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने ओबीसी हा प्रवर्ग निवडल्यास त्याला या प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्र यांची माहिती त्यात दिसेल. -     हे विद्यार्थी हे नमुना प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्याप्रमाणे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतील. 

टॅग्स :Educationशिक्षण