शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

इचोरीत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

By admin | Updated: September 12, 2014 01:54 IST

मंगरुळपीर तालुक्यातील तीन बालके दगावली.

मंगरुळपीर : तालुक्यातील इचोरी गावात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून, यात तीन बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर घटनेनंतर आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून, आणखी काही बालकांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. कासोळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या इचोरी गावात आठवडाभरापासून डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. या आजाराने तीन बालकांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सर्वप्रथम दि. ३ सप्टेंबर रोजी ५ वर्षीय पूजा राहुल कांबळे या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १0 सप्टेंबरच्या रात्री शिवानंद सोपान घोडके (वय १४ वर्ष), शिवाजी विजय नागरे (वय ५ वर्ष) यांचा वाशिम येथे उ पचारादरम्यान मृत्यू झाला. गावातील आणखी काही बालकांना या आजाराने ग्रासले असून, त्यांच्यावर वेगवेगळय़ा ठिकाणी खासगी दवाखान्यात उपचार चालू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दहा दिवसांपूर्वी इचोरी व कासोळा येथील रक्ताचे नमुने अकोला येथे पाठविण्यात आले. त्यातून डेंग्यूची लागण नसल्याचे निष्पन्न झाल्याचे तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. सदर आजाराची लक्षणे दिसताच ताप आल्यानंतर ८ ते १0 तासात बालके दगावली. एकाच रात्री दोन बालके दगावल्यानंतर आरोग्य विभागानेही इचोरी येथे धूर फवारणी केल्याचे सांगितले. ११ सप्टेंबर रोजी गावात दिवसभर आरोग्य विभागाकडून घरोघरी भेटी, उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे. आरोग्य विभागाने गावातील पिण्याचे पाणी व अस्वच्छतेमुळे तापीचा फैलाव झाल्याचे सांगितले.