शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका असल्याचे सांगून अर्भक पळविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 17, 2014 23:12 IST

वॉर्डबॉयची सतर्कता : दोडामार्ग येथील घटनेने खळबळ

दोडामार्ग : म्हापसा येथील आरोग्य विभागातून परिचारिका म्हणून आले आहे, असा बहाणा करीत एका महिलेने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील नवजात अर्भक वजन मोजणीसाठी नेत असल्याचे सांगून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील वॉर्डबॉय नीलेश बांदिवडेकर याच्या सतर्कतेमुळे या महिलेला पकडण्यात रुग्णालय कर्मचाऱ्यांना यश आले. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. तीन दिवसांपूर्वी मूळच्या कर्नाटक येथील व सध्या अतने-गोवा येथे राहत असलेल्या लल्ता व्यंकटेश कटीमणी यांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली होती. त्यांना बाह्यरुग्ण विभागात ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी ही महिला परिचारिका वेशात रुग्णालयात आली. त्यावेळी बाहेर असलेला वॉर्डबॉय नीलेश बांदिवडेकर याला ‘मी म्हापसा रुग्णालयातून आले आहे’ असे सांगून ती महिला बाह्यरुग्ण विभागात घुसली. तेथील लल्ता कटीमणी यांच्याकडे जाऊन ‘मी म्हापसा येथील रुग्णालयातून आले असून, नवजात बालकांचे वयोमान तपासते,’ असे सांगून त्यांच्या अर्भकास घेऊन ती बाहेर आली. त्याचवेळी बांदिवडेकर यांना त्या महिलेविषयी संशय आल्याने त्यांनी महिलेबाबत बालकाच्या नातेवाईकांकडे खात्री केली असता, त्या आमच्या कुणीही नातेवाईक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बांदिवडेकर यांनी त्या महिलेला अडविले व तिच्याकडून नवजात बालक काढून घेतले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. उशिरापर्यंत पोलीस त्या महिलेची कसून चौकशी करीत होते. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या घटनेमुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)महिलेकडून विसंगत माहिती दोडामार्ग येथे पकडण्यात आलेल्या संशयित महिलेच्या नावाबाबत संभ्रम निर्माण झाला असून, उशिरापर्यंत तिने आपले नाव पोलिसांना सांगितले नव्हते. तपासात पहिल्यांदा आपण म्हापसा येथील असल्याचे तिने सांगितले, परंतु ती विसंगत माहिती देत असल्याने तिच्याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकलीनाही.