इंदू मिलवर राजकारण नको - आठवले

By Admin | Updated: March 31, 2015 03:50 IST2015-03-31T03:50:58+5:302015-03-31T03:50:58+5:30

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने दोनवेळा ताबा घेऊन भूमीपूजन केले आहे.

Indu Millar does not want politics - Athavale | इंदू मिलवर राजकारण नको - आठवले

इंदू मिलवर राजकारण नको - आठवले

मुंबई : इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने दोनवेळा ताबा घेऊन भूमीपूजन केले आहे. त्यामुळे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी १४ एप्रिलला इंदू मिलचा ताबा घेऊन आणखी एकदा भूमीपूजनाचा सोपस्कार पार पाडू नये, अशा शब्दांत रिपाइं अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी निरुपम यांना टोला लगावला आहे. या विषयावर सोमवारी आठवले बोलत होते.

Web Title: Indu Millar does not want politics - Athavale