शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणी मुखर्जीने घटस्फोटासाठी कोर्टाकडे मागितली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 15:58 IST

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याची परवानगी मागितली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.  
 
टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणी मुखर्जी हिने तिचा पती पीटर मुखर्जी याच्याकडून घटस्फोट घेण्यासाठी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून परवानगी मागितली आहे. दरम्यान, याबाबत इंद्राणीच्या वकिलाने माहिती दिली आहे. 
 
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय अटकेत आहेत. 2012मध्ये इंद्राणी आणि पीटरनं शीनाची हत्या केली आणि रायगडच्या जंगलात शीनाचा मृतदेह फेकून दिला असा आरोप त्यांच्यावर आहे.
 
 
काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण-
- एप्रिल 2012 मध्ये इंद्राणीने दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय यांच्या मदतीने आपली मुलगी शीनाची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह रायगडजवळच्या जंगलात टाकून दिला होता.
- शीना ही इंद्राणीला पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. 
- ऑगस्ट 2015 मध्ये मुंबईपासून 80 कि.मी. अंतरावर रायगडच्या जंगलात शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले होते.
- डीएनए चाचणीत इंद्राणीच्या रक्ताचे नमुने शीनाच्या हाडांशी जुळले. त्यानंतर शीनाची उंची पाच फूट तीन इंच होती तसेच गळा आवळून शीनाचा मृत्यू झाला असे या अहवालात म्हटले होते.
- शीना बोरा हिच्याशी साखरपुडा होऊन लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या राहुल मुखर्जी याने शीना गायब होताच तिचा शोध सुरू केला होता. वडील पीटर यांच्याकडे तो वारंवार विचारणा करीत होता. शीनाशी प्रत्यक्ष बोलणे करून देण्याची विनंती करीत होता. परंतु पीटरने ती विनंती फेटाळली होती.
- शीना व पीटर यांच्यात आर्थिक वाद होते त्यातून शीनाची हत्या करण्यात आली. तसेच केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल याच्याशी असलेल्या संबंधामुळेच शीनाची हत्या करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
- पीटरचा मुलगा राहुल आणि इंद्राणीची मुलगी शीना हे सावत्र बहीण-भाऊ असल्यामुळे त्यांचे संबंध इंद्राणीसह पीटर या दोघांनाही मान्य नव्हते. 
- इंद्राणीला राहुल आवडत नव्हता. शीनासोबत असलेल्या संबंधांमुळेच खरेतर राहुलबद्दल तिला राग होता. त्यामुळे शीनाची हत्या केल्यानंतर तिच्या मोबाइल फोनवरून पाठविलेले संदेश वा शीना असल्याचे भासवून एकदा प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही राहुलने आपल्याला फक्त शीनाशी एकदा बोलायचे आहे. तिचा आवाज ऐकून तिने नकार दिल्यानंतर आपण तिच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही, असे त्याने पीटरला पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते. परंतु त्याची ही मागणी पीटरने साफ फेटाळली होती. 
- त्यामुळे सीबीआयने इंद्राणीसह पीटर मुखर्जी याच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.