शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

Oxygen Express: 'लाईफलाईन' आपली ओळख सार्थ ठरवतेय; देशाला ऑक्सिजन पुरवण्यासाठी दिवसरात्र धावतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:06 PM

Oxygen Express: रेल्वेच्या ऑक्सिजन एक्स्प्रेसमुळे अनेक राज्यांना दिलासा; शेकडोंचे प्राण वाचले

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या ५ दिवसांपासून देशात दररोज ३ लाख कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आहे. अनेक राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. या राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी रेल्वे गाड्या धावत आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून सध्या दिवसरात्र रेल्वेची सेवा सुरू आहे.गेले काही महिने अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी धावणारी रेल्वे आता ऑक्सिजन पुरवण्यासाठी धावत आहे. रेल्वेला देशाची लाईफलाईन म्हटलं जातं. ऑक्सिजन पुरवठा करून रेल्वे सध्या ही ओळख शब्दश: खरी ठरवत आहे. गेल्याच आठवड्यातून विशाखापट्टणमहून ऑक्सिजन एक्स्प्रेस राज्यात दाखल झाली. नागपूर, नाशिक भागात ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून ऑक्सिजनचे टँकर उतरवण्यात आले. या एक्स्प्रेसमधून राज्याला १०० टनांहून अधिक अधिक ऑक्सिजनचा पुरवठा झाला.जीव भांड्यात; २० तासांचा प्रवास करून विशाखापट्टणमहून नागपुरात पोहोचली ऑक्सिजन एक्स्प्रेसआज दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत दाखल झाली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ऑक्सिजनचे तीन टँकर्स घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोलीत पोहोचली. काल संध्याकाळी गुजरातच्या हापामधून ही एक्स्प्रेस निघाली होती. जामनगरमध्ये असलेल्या रिलायन्स उद्योगातून ऑक्सिजन घेऊन या एक्स्प्रेसनं ८६० किलोमीटर अंतर कापलं. या एक्स्प्रेसमधील टँकर्समधून महाराष्ट्राला ४४ टन ऑक्सिजनचा पुरवठा होईल.महाराष्ट्रासोबतच देशाच्या इतर राज्यांमध्येही सध्या ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये सध्या वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून मदत करत आहे. यामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. यामुळे रेल्वेची लाईफलाईन ही ओळख सार्थ ठरत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन