शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नौदलाचे ‘आॅपरेशन राहत’!

By admin | Updated: April 6, 2015 03:33 IST

अंतर्गत युध्द सुरु असलेल्या येमेन देशातून भारतीयांना सुखरुपपणे परत आणण्याचे काम भारतीय नौदल आणि हवाई दलाकडून सध्या केले जात आहे.

मुंबई : अंतर्गत युध्द सुरु असलेल्या येमेन देशातून भारतीयांना सुखरुपपणे परत आणण्याचे काम भारतीय नौदल आणि हवाई दलाकडून सध्या केले जात आहे. या दोन्ही दलाकडून चोख कामगिरी बजावली जात असतानाच नौदलाकडून ‘आॅपरेशन राहत’ या नावाखाली आणखी एक धाडसी कामगिरी करण्यात आली आहे. येमेनमधील एडेन बंदर येथून ४११ जणांची सुटका करुन त्यांना ‘आयएनएस मुंबई’ वर आणण्यात आले. यामध्ये ४४१ परदेशी नागरीक असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. हे जहाज या आॅपरेशननंतर भारताच्या दिशेने रवाना झाले. येमेनमध्ये सध्या अंतर्गत युध्द सुरु असून एडेन शहरात तर मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री सुरु आहे. या युध्दामुळे येमेनमध्ये अनेक देशातील नागरीक अडकले असून प्रत्येक देशाकडून आपल्या नागरीकांना अनेक पर्यायी मार्गाने बाहेर काढले जात आहे. यामध्ये भारतानेही आपल्या नागरीकांना येमेनमधून परत आणले आहे. नौदलाने तर ३0 मार्चपासून येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी ‘आॅपरेशन राहत’नावाने कामगिरीच सुरु केली असून आतापर्यंत तीन कामगिरी बजावण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब घटना म्हणजे ४ एप्रिल रोजी येमेनच्या आदेन येथील बंदरातून ४४१ जणांची सुटका करण्यात नौदलाला यश आले आहे. एडेनमधील बंदरात ४४१ जण अडकले होते. त्यांना आणण्यासाठी नौदलाची आयएनएस मुंबई या जहाजाला रवाना करण्यात आले होते. मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेला गोळीबार आणि बंदरात येण्याची नसलेली परवानगी यामुळे आयएनएस मुंबई जहाज एडेन बंदरापासून जवळपासच उभे राहिले. नौदलाने तातडीने हालचाली करुन एडेन बंदरातून बारा भाड्याचा छोट्या बोटी घेतल्या आणि त्यांच्या सहाय्याने आयएनएस मुंबई जहाजावर ४४१ जणांना पोहोचविण्यात आले. यामध्ये १७६ जण हे परदेशी नागरीक आहेत. त्यानंतर हे जहाज भारताच्या दिशेने रवाना झाले. हे आॅपरेशन सुर्यास्त होण्यापूर्वी करण्यात आल्याचे नौदलाचे प्रवक्ते सिन्हा यांनी सांगितले.