शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या मापदंडामुळेच स्त्रियांवरील अत्याचार वाढलेत

By admin | Updated: July 31, 2014 01:07 IST

पुरातन काळापासून समाजाने स्त्रियांसाठी अन् पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड लावलेले आहेत. हे मापदंड स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला तडा देतात. या मापदंडामुळेच समाजात स्त्रियांवरील अत्याचार

मान्यवरांचे प्रतिपादन : ‘पुरुषी नैतिकता : स्त्री अत्याचाराचे खरे कारण’ परिसंवादनागपूर : पुरातन काळापासून समाजाने स्त्रियांसाठी अन् पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड लावलेले आहेत. हे मापदंड स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला तडा देतात. या मापदंडामुळेच समाजात स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि आकांक्षा प्रकाशन नागपूरच्यावतीने शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात ‘पुरुषी नैतिकता : स्त्री अत्याचाराचे खरे कारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्त्री शक्तीच्या विभाग अध्यक्ष अरुणा सबाने होत्या.परिसंवादात डॉ. कुमार शास्त्री, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. मनिषा कोठेकर सहभागी झाल्या होत्या. डॉ. मनिषा कोठेकर म्हणाल्या, नैतिक मूल्य शाश्वत आहेत. समाजाच्या मापदंडामुळे अनेकदा कनिष्ठ असलेली स्त्री अत्याचाराला बळी पडते. पुरुष-स्त्रीकडे पाहण्याची भेदभावाची दृष्टी अत्याचाराला जन्म देते. जन्मच नाकारणे ही स्त्रियांवरील अत्याचाराची सुरुवात आहे. पुरुषापेक्षा कनिष्ठ असलेल्या स्त्रीने आपल्यापोटी जन्म घेऊ नये, असे सर्वांनाच वाटते. त्यातूनच स्त्री भ्रूणहत्या वाढली. मुलापेक्षा मुलीला कमी खायला देऊन त्यांना कुपोषित करणे, कामाचा बोजा, अकाली विवाह, मातृत्व, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, मृत्यू हे स्त्रियांवरील अत्याचाराचे विविध प्रकार त्यांनी सांगितले. स्त्रियांवरील अत्याचारामुळे आपण पुरुषांपेक्षा कनिष्ठ असल्याची स्त्रियांची मानसिकता बनली असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, सार्वजनिक आणि खाजगी असे स्त्री अत्याचाराचे क्षेत्र आहेत. दलित, आदिवासी महिलांवरील अत्याचार, वैयक्तिक, खाजगी, राजकीय स्वार्थ, धार्मिक, सांस्कृतिक कारणातून स्त्री अत्याचार घडतात. यामागे पुरुषी सत्तेचा दृष्टिकोन कारणीभूत आहे. दलितालाही आपली पत्नी कनिष्ठ वाटते. अन्याय होणाऱ्या स्त्रीला आपल्यावर अन्याय होत नाही असे वाटण्याचे कारणही पुरुषी वृत्तीच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. कुमार शास्त्री यांनी स्त्री अत्याचारात मानसिकता महत्त्वाची असल्याचे सांगून स्त्रीने गुलामगिरीची मानसिकता का स्वीकारली याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.डॉ. अरुणा सबाने यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचालन सुजाता लोखंडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. परिसंवादाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)