घरांच्या किमती कमी झाल्यानंतर प्रतिसादात वाढ

By Admin | Updated: May 30, 2014 02:27 IST2014-05-30T02:27:39+5:302014-05-30T02:27:39+5:30

म्हाडाच्या घरांच्या किमती काही प्रमाणात कमी केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

Increase in response to housing prices decreased | घरांच्या किमती कमी झाल्यानंतर प्रतिसादात वाढ

घरांच्या किमती कमी झाल्यानंतर प्रतिसादात वाढ

मुंबई : म्हाडाच्या घरांच्या किमती काही प्रमाणात कमी केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. लॉटरीत सहभागी होणार्‍या इच्छुकांची संख्या एका दिवसात १० हजारांनी वाढली असून अनामत रक्कम भरणार्‍यांचा आकडा ५० हजारांपर्यंत पोहोचला आहे. नव्या नियोजनाप्रमाणे २५ जूनला लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी नाव नोंदण्यासाठी ७ जून तर आॅनलाइन अर्ज व डीडीद्वारे रक्कम भरण्यासाठी अनुक्रमे ९ व ११ जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. म्हाडा घराचे सरासरी ७५ हजार ते ४ लाखांंपर्यत दर कमी झाल्याने इच्छुकांनी नशीब आजमावण्याला भर दिला आहे. त्यासाठी आज रात्री ८ वाजेपर्यंत नावनोंदणी करणार्‍यांची संख्या ८९ हजार ६४३ पर्यंत झाली होती. त्यापैकी मुंबईतून ७८ हजार ३६६ जणांनी तर कोकण बोर्डात ९,१५९ अशा ८७ हजार ५२५ जणांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. पेमेंट भरणार्‍यांची संख्या दोन्ही मंडळांमध्ये अनुक्रमे ४४ हजार ८२६ व ५,१११ अशी एकूण ४९,९३७ इतकी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Increase in response to housing prices decreased