शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीएससी’ची अपात्र निवड

By admin | Updated: September 4, 2015 00:54 IST

नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने शैक्षणिक अर्हता आणि कामाचा अनुभव याविषयी दिलेली माहिती असत्य व असंभवनीय असल्याचे सहजपणे लक्षात येण्यासारखे असूनही

मुंबई : नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने शैक्षणिक अर्हता आणि कामाचा अनुभव याविषयी दिलेली माहिती असत्य व असंभवनीय असल्याचे सहजपणे लक्षात येण्यासारखे असूनही त्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एका अपात्र उमेदवाराची निवड केली आणि त्यानुसार त्यास राज्य सरकारमध्ये नोकरीही मिळाली, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणापुढील (मॅट) एका प्रकरणात उघड झाली आहे.आयोगाने ज्याची निवड केली तो उमेदवार भरती नियमांनुसार स्पष्टपणे अपात्र होता, असा स्पष्ट निष्कर्ष ‘मॅट’ने नोंदविला. एवढेच नव्हेतर, तक्रार करूनही आयोगाने आणि राज्य सरकारने याची सखोल चौकशी करण्याची तसदीही न घेता त्या उमेदवाराने दिलेले न पटणारे स्पष्टीकरण कसे काय मान्य केले, असा अचंबाही न्यायाधिकरणाने व्यक्त केला.भाषा संचालनालयात भाषांतरकार या पदावर काम करणारे अजित रामचंद्र पोवार यांनी केलेल्या याचिकेवर निकाल देताना ‘मॅट’चे उपाध्यक्ष राजीव अगरवाल व न्यायिक सदस्य आर.बी. मलिक यांनी लोकसेवा आयोग व राज्य सरकारच्या डोळेझाक कारभारावर कोरडे ओढले. ज्या अपात्र उमेदवारास नेमले गेले तो आता राजीनामा देऊन निघून गेल्याने ते पद रिकामे आहे. त्यामुळे त्या निवड प्रक्रियेत पोवार हे आता एकमेव उमेदवार शिल्लक राहिले आहेत. परिणामी, आधी केलेला अर्ज व झालेली मुलाखत याआधारे त्यांना या पदावर नेमण्याचा सरकारने विचार करावा आणि ते पात्र ठरत असतील तर त्यांना तीन महिन्यांत नियुक्ती दिली जावी, असा आदेशही न्यायाधिकरणाने दिला.भाषा संचालनालयातील भाषा अधिकारी (हिंदी) या पदावर मनीष शंकरराव गवई यांची निवड व नेमणूक केली गेल्याबद्दलचा हा वाद आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील हे एकमेव पद भरण्यासाठी लोकसेवा आयोगाने सप्टेंबर २०११मध्ये जाहिरात दिली होती. त्यानुसार आलेल्या अर्जांमधून गवई व पोवार या दोनच उमेदवारांना जून २०१२मध्ये मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. गवई यांची निवड करून जुलै २०१२मध्ये त्यांची नेमणूक केली गेली. पोवार यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती घेऊन गवई यांनी दिलेली माहिती कशी खोटी आहे व ते निवडीसाठी कसे अपात्र होते याची तक्रार केली. पण त्याने दाद न लागल्याने ते ‘मॅट’मध्ये आले होते.या सुनावणीत पोवार यांच्यासाठी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी तर आयोग व राज्य सरकारसाठी सरकारी वकील एन.के. राजपुरोहित यांनी काम पाहिले. गवई यांच्यासाठी कोणीही हजर नव्हते. (विशेष प्रतिनिधी)