बांदा तपासणी नाक्यावर ५० लाखांची अवैध दारू जप्त; पोलीसांची कारवाई, कंटेनरही घेतला ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 11:36 IST2021-03-24T11:29:46+5:302021-03-24T11:36:03+5:30

गेल्या काही महिन्यात पोलीसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. या कारवाईत ६०० हून अधिक गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

Illegal liquor worth Rs 50 lakh seized at Banda check post; Police took action and seized the container | बांदा तपासणी नाक्यावर ५० लाखांची अवैध दारू जप्त; पोलीसांची कारवाई, कंटेनरही घेतला ताब्यात

बांदा तपासणी नाक्यावर ५० लाखांची अवैध दारू जप्त; पोलीसांची कारवाई, कंटेनरही घेतला ताब्यात

बांदा : गोव्यातून पुण्याकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी बांदा चेकपोस्टवर मोठी कारवाई केली. या कारवाईत जवळपास ५० लाख रुपयांचा दारुसाठा व ५ लाख रुपयांचा कंटेनर, असा सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Illegal liquor worth Rs 50 lakh seized at Banda check post; Police took action and seized the container also)

ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी टी. टी. कोळेकर, प्रथमेश पोवार यांनी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास केली. दारुसाठा मोजमाप करण्याचे काम सुरु असून मुद्देमालाचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या काही महिन्यात पोलीसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. या कारवाईत ६०० हून अधिक गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Illegal liquor worth Rs 50 lakh seized at Banda check post; Police took action and seized the container