शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात परीक्षा घेण्याचा IGNOU चा प्रताप, विद्यार्थ्यांचा मनस्ताप

By admin | Updated: June 19, 2015 16:22 IST

मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील जनजीवन ठप्प पडले असतानाच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने भर पावसातही परीक्षा घेण्याचा घाट घातला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ - मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील जनजीवन ठप्प पडले असतानाच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने भर पावसातही परीक्षा घेण्याचा घाट घातला. विद्यापीठाच्या दिल्ली व मुंबईतील अधिका-यांमधील समन्वयाअभावी ऐन पावसातही या परीक्षा पार पडल्याने विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेलाच मुकावे लागले. 
मुंबईत गुरुवारी रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी सकाळपासून तिन्ही मार्गांवरील लोकल सेवाही ठप्प असून रस्त्यांवरही पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतुकही मंदावली आहे. दुपारी असलेली समुद्रातील भरती व मुसळधार पाऊस या पार्श्वभूमीवर मुंबई व ठाण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आवाहन  प्रशासनाने केले होते. तर मुंबई विद्यापीठानेही आजच्या सर्व लेखी व तोंडी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मात्र इंदिरा गांधी विद्यापीठाला मुंबईतील परिस्थितीचा विसरच प़ड़ला. 
शुक्रवारी सकाळी मुक्त विद्यापीठाच्या सोमेय्या महाविद्यालयातील केंद्रावर नियोजित वेळेतच परीक्षा पार पडल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. काही जण परीक्षा संपण्याच्या काही मिनीटांपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचले. तर अनेकांना परीक्षेलाच मुकावे लागले. याविरोधात एका विद्यार्थ्यांनी स्थानिक अधिका-यांकडे लेखी तक्रारही दिली आहे. मुंबईतील जनजीवन ठप्प पडले असताना विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला पाहिजे हवा होता असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दिल्लीतील अधिका-यांकडून काहीची आदेश न आल्याने आम्ही नियोजीत वेळेतच परीक्षा घेतल्या असे विद्यापीठाच्या सोमेय्या केंद्रातील अधिका-यांनी सांगितले.