विधानसभा अध्यक्षांनी जर सुधारित वेळापत्रक सादर केले नाही तर...; उज्ज्वल निकमांनी सांगितले काय होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:18 PM2023-10-30T12:18:28+5:302023-10-30T12:19:48+5:30

आमदार अपात्रतेबाबतचे अधिकार हे निवडणूक अध्यक्षांना आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक न देता मागच्याच वेळापत्रकाची री ओढली तर...

If the Speaker of the Legislative Assembly Rahul Narvekar does not submit the revised schedule on Mla Disqualification; Ujjwal Nikam said what will happen | विधानसभा अध्यक्षांनी जर सुधारित वेळापत्रक सादर केले नाही तर...; उज्ज्वल निकमांनी सांगितले काय होईल

विधानसभा अध्यक्षांनी जर सुधारित वेळापत्रक सादर केले नाही तर...; उज्ज्वल निकमांनी सांगितले काय होईल

सुप्रीम कोर्टात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाबाबत सुनावणी आहे. या सुनावणीत गेल्यावेळी सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष हे आज सुधारित वेळा पत्रक सादर करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर हे दिल्लीत गेले होते. त्यांना आज सुधारित वेळापत्रक द्यायचे आहे. यामध्ये काय होऊ शकते यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली आहे. 

सुधारित वेळापत्रक न देता अध्यक्षांनी मागचेचं वेळापत्रक दिले, ते देण्याबाबत त्याचे औचित्य काय हे सुप्रीम कोर्टाला पटवून द्यावे लागणार आहे. त्यांनी सुधारित वेळापत्रक सादर केले तर त्या वेळापत्रकाप्रमाणे सुनावणी घेवून दोन्ही पक्षाबाबत कार्यवाही करण्याबाबत सुप्रीम कोर्ट हे अध्यक्षांना मार्गदर्शक सूचना देवू शकते, असे निकम म्हणाले. 

विधानसभा अध्यक्षांनी जर सुधारित वेळापत्रक जर सादर केले नाही तर, सुप्रीम कोर्ट हे त्यांच्या पद्धतीने याप्रकरणात हस्तक्षेप करू शकते आणि अध्यक्षांना सुनावणी घेण्याबत नवीन वेळापत्रक हे सुप्रीमकोर्ट देवू शकते आणि त्या पद्धतीने अध्यक्षांनी कारवाई करणे हे बंधनकारक असेल, असे निकम म्हणाले. 

आमदार अपात्रतेबाबतचे अधिकार हे निवडणूक अध्यक्षांना आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक न देता मागच्याच वेळापत्रकाची री ओढली तर यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकते आणि याबाबतीत योग्य काय तो निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा सुप्रीम कोर्टाला आहे, असे निकम म्हणाले. 

Web Title: If the Speaker of the Legislative Assembly Rahul Narvekar does not submit the revised schedule on Mla Disqualification; Ujjwal Nikam said what will happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.